Rajasthan Assembly Election Result 2023 
देश

Rajasthan Results: योगी की इम्रान खान? 'या' मतदारसंघावर ठरणार राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची!

Sandip Kapde

Rajasthan Assembly Election Result 2023: राजस्थानमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने यावेळी राजस्थानच्या निवडणुकीत खासदार कार्ड चालवले आहे. याचा फायदा देखील भाजपला होताना दिसत आहे.  भाजप खासदार बाबा बालकनाथ तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

2013 च्या निवडणुकीत भाजपने ही जागा जिंकली होती. यावेळी काँग्रेसने बालकनाथ यांच्या विरोधात 36 वर्षीय माजी बसपा नेते इम्रान खान यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान तिजारा विधानसभेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या ७ खासदारांना मैदानात उतरवले आहेत. यामध्ये खासदार महंत बाबा बालकनाथ योगी (Mahant Balaknath Yogi) यांचा देखील समावेश आहे.

बाबा बालकनाथ यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अलवरमधून काँग्रेसच्या भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. बालकनाथ हे भाजपचे फायर ब्रँड नेते मानले जातात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली. त्यांची 'भावी मुख्यमंत्री' म्हणून वर्णी लागली आहे. (Rajasthan Tijara Seat Result)

बालकनाथ यांनी निवडणूक लढविल्याने तिजारा ही जागा चर्चेत आली आहे. या जागेवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तिजारा येथे बालकनाथ 41642 मतांनी आघाडीवर आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT