rajasthan couple filmy style suicide like film ishaqzaade
rajasthan couple filmy style suicide like film ishaqzaade 
देश

प्रेमीयुगलाने रात्रभर मजा करत संपवले जीवन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: चित्रपटातील कथेप्रमाणे एका प्रेमीयुगलाने रात्रभर एकमेकांसोबत निर्जनस्थळी वेळ घालवला. दोघांनी दारू प्यायल्यानंतर एकमेकांवर गोळी झाडत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वीचे अनेक क्षण त्यांनी मोबाईमध्ये कैद केले आहे.

प्रेमी युगुलांनी एकमेकांसोबत वेळ घालवणे, पार्टी करत दारु पिणे आणि नंतर एकमेकांवर गोळी झाडत आत्महत्या करणे हा घटनाक्रम आपण चित्रपटात पाहिला असेल. हबीब फैसल यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट 'इश्कजादे'मध्येही असे कथानक आहे. मात्र, खऱ्या आयुष्यातही असा प्रसंग घडला आहे. राजस्थानमधील बाडमेरच्या एका प्रेमी युगुलाने चित्रपटाची कथा वाटावी अशा नाट्यमयपणे आत्महत्या केली आहे.

प्रेमीयुगल शहरापासून एका निर्जन स्थळी गेले होते. रात्रभर एकमेकांसोबत वेळ घालवत त्यांनी पार्टी केली. दारुही प्यायल्यानंतर त्यांनी एकमेकांवर गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रसंगाचे विविध क्षण त्यांनी मोबाईमध्ये कैद करून ठेवत जगाचा निरोप घेतला आहे. पहिल्या छायाचित्रात एक हात दिसत असून, त्यामध्ये प्रेयसीने आपल्या हातावर मेहंदीने आपल्या प्रियकराचे नाव लिहिले आहे. त्यांच्या जवळच एक दारूची बाटली दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रात मुलीच्या दोन्ही हातात पिस्तुल दिसत आहे. तिने एका हाताने आपल्या स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल रोखले आणि दुसऱ्या हाताने प्रियकराच्या डोक्यावर पिस्तुल धरल्याचे दिसत आहे. प्रियकराचाही एक हात प्रेयसीच्या डोक्यावर धरलेल्या बंदुकीच्या ट्रिगरवर दिसत आहे. तिसऱया छायाचित्रात युवक आणि युवती दोघे आपल्या हातात पिस्तुल घेऊन आपआपल्या डोक्यावर रोखताना दिसत आहेत. अखेर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोघांच्याही डोक्यात गोळी घुसल्याचे दिसत आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील चौकशी सुरु केली आहे. संबंधित घटना चौहटन पोलिस ठाण्यांतर्गत लिलसर सरहद गावातील आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून, दोघांच्या प्रेमाची चर्चा सुरु आहे. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT