Rajasthan govt raises incentive for inter-caste marriage to Rs 10 lakh Sakal
देश

Inter-Caste Marriage scheme: आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मिळणार 10 लाख रुपये; वाचा काय आहे योजना

Rajasthan Inter-Caste Marriage scheme News: भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सहसा मान्यता मिळत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Inter-Caste Marriage scheme : भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सहसा मान्यता मिळत नाही. भारतात जात किंवा धर्माबाहेर लग्न केल्यामुळे अनेक समाजात आणि कुटुंबात वाद होतात. 

पण सामाजिक समता आणि सलोखा राखण्यासाठी तसेच अस्पृश्यता निर्मुलनासाठी सरकार काम करत आहे. राजस्थानमध्ये इंटरकास्ट मॅरेजसाठी प्रोत्साहन रक्कम 10 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम 5 लाख रुपये होती. (Rajasthan govt raises incentive for inter-caste marriage to Rs 10 lakh)

राजस्थानमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागातर्फे संचालित डॉ. सविता बेन आंबेडकर आंतरजातीय विवाह योजना (Dr. Savita Ambedkar Inter Caste Marriage Scheme) अंतर्गत, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन रक्कम आता 10 लाख रुपये करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रक्कम वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत 8 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या जातील. उर्वरित 5 लाख रुपये संयुक्त बँक खात्यात जमा केले जातील. 2023-24 च्या अर्थसंकल्पात गेहलोत यांनी या संदर्भात घोषणा केली होती.

काय आहे योजना?

या आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत राज्य सरकार आर्थिक मदत करते. अनुसूचित जाती प्रवर्गातील एक तरुण किंवा मुलगी ज्याने सवर्ण हिंदू मुला किंवा मुलीशी लग्न केले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

यासोबतच दोघेही मूळचे राजस्थानचे असावेत. जोडप्यांपैकी एकाचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच, कोणत्याही फौजदारी खटल्यात दोषी नसावा आणि तो अविवाहितही असावा. 1 महिन्याच्या आत अर्ज केल्यावर, लाभार्थीला प्रोत्साहन रक्कम दिली जाते.(Latest Marathi News)

यासाठी अधिकारी कार्यालयाने आंतरजातीय जोडप्याच्या विवाहाचा पुरावा म्हणून जारी केलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच जोडप्याचे एकत्रित उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

कुठे अर्ज करायचा :

आंतरजातीय विवाह योजनेत प्रोत्साहन रक्कम मिळविण्यासाठी उमेदवाराला विभागीय SJMS पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. योजनेची सविस्तर माहिती आणि अर्ज www.sje.rajasthan.gov.in वर देखील उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT