sachin pilot Ashok gehlot  
देश

काँग्रेसच्या हातून राजस्थानही जाण्याची स्थिती; 82 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 82 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची स्थिती असताना त्यांना विरोध होत असून सरकार कोसळण्याची स्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीपूर्वी होणारी ही बैठक विशेष मानली जात आहे. आज संध्याकाळी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, धारिवाल यांच्या घरी होणाऱ्या बैठकीचा अजेंडा काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अशोक गेहलोत यांच्या सर्वात निष्ठावान नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यासाठी ही बैठक होत असल्याची चर्चा आहे.

अशोक गेहलोत गटाने त्यांच्या गटातील मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबतचा ठरावही गेहलोत गटाने मंजूर केला आहे. तसेच पक्षाने त्यांचा प्रस्ताव मान्य न केल्यास अशोक गेहलोत गटाचे आमदार आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यामुळे राजस्थानही काँग्रेसच्या हातून जाण्याची शक्यता आहे.

या सर्व प्रकारादरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडू इच्छित नाहीत, या मीडियाने वावड्या उडवून दिल्या आहेत. वास्तविक असं माझ्या मनात कधीच आलं नाही. मात्र राजस्थानमधील पुढची निवडणूक जिंकणे महत्त्वाचं असल्याचं आपण हायकमानला सांगितल्याचं गेहलोत म्हणाले.

अशोक गेहलोत गटाचे आमदार आणि विद्यमान सरकारमधील मंत्री गोविंद राम मेघवाल म्हणाले की, अशोक गेहलोत यांनीच मुख्यमंत्री राहावे. पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय आमदारांच्या मतावरच व्हायला हवा, असे दुसरे आमदार सन्यम लोढा यांनी म्हटले नाही. तसे झाले नाही तर सरकारही पडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : विद्यार्थ्यांना मुख्य संदेश हाच द्यायचा आहे की, आम्ही तुमच्या सोबत आहोत - राहुल गांधी

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT