sex clips and blackmailing women for money file photo
देश

'सेक्सटॉर्शन'ला बनवलं फॅमिली बिझनेस, ३०० महिलांकडून उकळले ३० लाख

हक्मुद्दीनचं शिक्षण दहावी पर्यंत झालं आहे. तो आपल्या तीन नातेवाईकांच्या मदतीने सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालवत होता.

दीनानाथ परब

जयपूर: मागच्या दीड वर्षांपासून 'सेक्सटॉर्शन'च रॅकेट (sextortion racket) चालवणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. हक्मुद्दीन असे आरोपीचे नाव आहे. त्याला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने (delhi police cyber cell) अटक केली आहे. हक्मुद्दीनने देशभरातील ३०० पुरुष आणि महिलांना ब्लॅकमेल केलं. त्यांच्याकडून ३० लाख रुपये उकळले. आरोपीला मूळचा राजस्थानचा (Rajasthan) आहे. त्याला शनिवार भारतपूरमधील (Bharatpur) त्याच्या गावातून अटक करण्यात आली. ते फेसबुक आणि WhatsApp वरुन आपले लक्ष्य जाळ्यात ओढायचा.

हक्मुद्दीनचं शिक्षण दहावी पर्यंत झालं आहे. तो आपल्या तीन नातेवाईकांच्या मदतीने सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालवत होता. या रॅकेटला त्याने फॅमिली बिझनेसचे नावं दिलं होतं, असं सायबर सेलचे डीसीपी के.पी.एस. मल्होत्रा यांनी सांगितलं. अन्य तीन आरोपी फरार आहेत. ते सुद्धा त्याच गावतील असून मुख्य आरोपीची ती चुलत भावंड आहेत. मॉर्फ केलेले फोटो आणि अश्लील व्हिडीओ वापरुन ते टार्गेट ब्लॅकमेल करायचे. साईकुल (२२), साकीर (२७) आणि वसिम (२६) अशी फरार असलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. 'द प्रिंट'ने हे वृत्त दिलं आहे.

जुलै महिन्यात पोलिसांकडे दिल्ली स्थित एका माणसाने तक्रार नोंदवली. एका महिलेने आपल्याला फेसबुक रिक्वेस्ट पाठवून फोन नंबर मागितल्याचं त्या व्यक्तीने तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर पॉर्नोग्राफीक कंटेटचा WhatsApp व्हिडीओ कॉल आल्याचं त्यानं सांगितलं तसंच मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठण्यात आले. त्यावर पीडीत व्यक्तीचा चेहरा होता. फोन करणाऱ्याने त्याला ब्लॅकमेल केलं. १.९६ लाख रुपयाची मागणी केली.

अखेर दबावाखाली येऊन पीडीत व्यक्तीने पेटीएमद्वारे ती रक्कम अदा केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे अन्य नऊ जणांनी अशाच प्रकारची तक्रार केली. हक्मुद्दीनने अन्य गुन्ह्यातील त्याच सहभाग स्वीकारला आहे. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

Akola Crime News : अक्षय नागलकर हत्याकांडातील आणखी चार आरोपींना अटक; ‘एलसीबी’ची मोठी कारवाई...

Latest Marathi News Live Update : गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT