SK Dhariwal
SK Dhariwal टिम ई सकाळ
देश

"राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे बलात्काराचे प्रमाण जास्त"

सकाळ डिजिटल टीम

राजस्थान (Rajsthan) विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी अधिवेशनात चर्चेदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील एका मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्याने तेथे चर्चेला उधान आले. मंत्री शांती धारिवाल (SK Dhariwal) यांनी विधानसभेत बोलताना राजस्थान राज्य बलात्काराच्या बाबतील देशात पहिल्या स्थानावर असल्याचे सांगितले. याबाबतचे कारण सांगताना राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याने इथे जास्त बलात्कार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आणि असे म्हणताना धारीवाल चक्क हसत होते आणि त्यांच्यासोबत अनेक मंत्री आणि काँग्रेसचे नेतेही हसू लागले.

या सर्व प्रकरणाने राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणावर आता मंत्री शांती धारिवाल यांनी प्रतिक्रिया दिली.

या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. शांती धारिवाल या संदर्भात बोलताना म्हणाले की, “मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. विधानसभेमध्ये बोलताना माझी जीभ घसरली. मला, ‘इस प्रदेश में ये मरज़ कहां से आ गया’ असे म्हणायचे होते, परंतु चुकून ‘ये मर्दों का प्रदेश है’, असे तोंडातून बाहेर पडले. मी सभागृहाची माफी मागतो.”

धारीवाल यांनी जेव्हा विधानसभेत बोलत होते. तेव्हा विधानसभेचे थेट प्रक्षेपण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून केले जात होते. नंतर YouTube चॅनेल आणि असेंबली रेकॉर्डमधून हा व्हिडीओ काढून टाकण्यात आला. विशेष म्हणजे ते बोलत असताना सभागृहात भाजपचा एकही आमदार नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT