Bus Accident Esakal
देश

Bus Accident: प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली; ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळली

अंकिता खाणे (Ankita Khane)

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर कोसळली. या भीषण अपघातामध्ये ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हा भीषण अपघात राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर डीएमसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक प्रवासी बस कल्व्हर्टचे रेलिंग तोडून खाली रेल्वे रुळावर पडली, त्यामुळे गाड्यांची वाहतूकही ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री 2.15 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा भीषण अपघात झाला. हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे बस लोखंडी रेलिंग तोडून कल्व्हर्टवरून खाली पडली. जयपूर दिल्ली रेल्वे मार्गावर बस थेट रुळावर पडली. कल्व्हर्टवरून बस रेल्वे रुळावर पडल्याची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी दाखल झाले, तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.

अपघातानंतर काही वेळातच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला मिळताच जयपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT