rajanikant.
rajanikant. 
देश

रजनीकांत-कमल हसन येणार एकत्र? तमिळनाडूत नव्या समीकरणांची नांदी

सकाळ ऑनलाईन

चेन्नई- तमीळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचे सुतोवाच केले आहेत. आघाडी करण्याबाबत आता रजनीकांत यांना निर्णय घ्यायचा आहे, असं ते म्हणाले आहेत. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

माझ्यात आणि रजनीकांत यांच्यात फोनवर बोलणे झाले. जर आमची विचारधारा सारखी असेल आणि त्यामुळे लोकांचा फायदा होणार असेल, तर आम्ही आमचा इगो बाजूला ठेवण्यास तयार आहोत, असं वक्तव्य अभिनेते आणि मक्कल निधी मेयम Makkal Needhi Maiam चे प्रमुख कमल हसन म्हणाले आहेत. रजनीकांत यांच्यासोबत जाणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. 

रजनीकांत यांना आता आपल्या आघाडीबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर, आम्ही दोघे एकत्र बसू आणि बाकीची चर्चा करु, असं कमल हसन म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने तमिळनाडूमध्ये वेगळी समीकरणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रजनीकांत आणि कमल हसन दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. त्यांच्या मागे मोठा फॅन फॉलोवर आहे. 

रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्यावरुन दीर्घ काळापासून सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपुष्टात आणला होता. त्यांनी जानेवारी 2021 मध्ये राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. आम्ही जनतेला एक पारदर्शी, भ्रष्टाचार मुक्त आणि कोणत्याही धार्मिक-जातीयवाद न करणारे सरकार देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. रजनीकांत हे पूर्वीपासून तामिळनाडूमधील जनतेला एक राजकीय पर्याय देण्याबाबत बोलत होते. आता त्यांनी त्या दिशेने आपले पाऊल उचललंय. 

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. असे असले तरी त्यांची अधिकृतपणे राजकारणात एँट्री झालेली नाही. मागीलवर्षी कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे उभय नेते एकत्र येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रजनीकांत भाजपचे कमळ हाती घेतील अशीही एक अटकळ बांधली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT