देश

राजीव गांधी हत्या ! दोषीने तुरुंगात अभ्यास करून जिंकले होते सुवर्णपदक

राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील दोषींपैकी पेरारिवलनची तब्बल 31 वर्षांनंतर सुटका होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक एजी पेरारिवलनची तब्बल 31 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका होणार आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची सुटका केली जाणार आहे. या संपूर्ण कायदेशीर लढाईत आपल्याला गांधी यांच्या हत्येच्या कटाची कल्पना नसल्याचे पेरारिवलन सांगत होता. पेरारिवलन याला राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी वयाच्या 19 वर्षी अटक करण्यात आली होती. दरम्यान, तुरुंगात असताना पेरारिवलन याने तुरुंगातून शिक्षण पूर्ण केले. यातील एका परिक्षेमध्ये त्याने सुवर्णपदकदेखील पटकावले होते. (Rajiv Gandhi convict AG Perarivalan)

राजीव गांधींच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप

पेरारिवलन याला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत हात असल्याच्या आरोपानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पेरारिवलन याला 11 जून 1991 रोजी त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. पेरारिवलनने पेराम्बुदूरच्या जाहीर सभेत राजीव गांधी यांची हत्या झाली त्यामध्ये वापरलेल्या बॅटरीची व्यवस्था केली होती.

पेरारिवलन अभियांत्रिकीचा हुशार विद्यार्थी

पेरारिवलन हा एक अभियांत्रिकीचा हुशार विद्यार्थी होता. अटकेनंतर त्याने तुरुंगात पुढील शिक्षण घेतले. यामध्ये त्याने एका परीक्षेत सुवर्णपदक पटकावला होते. पेरारिवलनला अरिवू नावाने देखील ओळखले जाते.अरिवूचे वडील एका शाळेत शिक्षक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT