Rajiv-Gandhi
Rajiv-Gandhi 
देश

राजीव यांच्या हत्येचे नेत्याकडून समर्थन - सीमन

पीटीआय

चेन्नई - नाम तमीळ कच्छी (एनटीके) या पक्षाचे संस्थापक नेते सीमन यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणारे विधान केले आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे तमिळनाडूमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून, त्यांच्या विधानाला काँग्रेसकडून जोरदार विरोध होत आहे. तसेच, सीमन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तमिळनाडू काँग्रेसने केली.

विक्रवंडी मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत बोलताना सीमन यांनी हे विधान केले. स्थानिक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने सीमन यांचे विधान हे राष्ट्रीय एकात्मता बिघडवणारे आहे असा आरोप करत विक्रवंडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विक्रवंडी येथील प्रचार सभेच्या वेळी सीमन यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येचे समर्थन केले असल्याचे दिसते. पुढे बोलताना त्यांनी राजीव गांधी यांच्या श्रीलंकेत शांतिसेना पाठवण्याच्या निर्णयावर टीकादेखील केल्याचे या व्हिडिओत दिसते. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. एस. अळगिरी आणि पक्षाचे लोकसभेचे खासदार  तिरुनवक्करसर यांनी सीमन यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT