नवी दिल्ली : काँग्रेसनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) केलेल्या टीकात्मक ट्विटवर आता खुद्द RSSनं प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं संघावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लोकांमध्ये द्वेष पसरवून त्यांच्याशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोपही RSS कडून करण्यात आला आहे. (Rajiv Gandhi Pandit Nehru tried to ban RSS but RSS reaction on Congress tweet)
"काँग्रेसला लोकांशी द्वेषभावना पसरवून जोडून घ्यायचं आहे. काँग्रेसनं बऱ्याच काळापासून आमचा द्वेष केला आहे. राहुल गांधींचे वडील आणि आजोबांनी RSSला थांबवण्याचा प्रयत्न केला पण संघ थांबला नाही. उलट संघ वाढतच राहिला कारण आम्हाला लोकांचा सातत्यानं पाठिंबा मिळत गेला" अशा शब्दांत संघाचे पदाधिकारी डॉ. एम. वैद्य यांनी काँग्रेसच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.
काँग्रेसनं काय ट्विट केलं?
काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केलं की, "देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप-RSSनं केलेलं नुकसान पूर्ववत करण्यासाठी टप्प्याटप्प्याने, आम्ही आमचे ध्येय गाठू. दरम्यान, या ट्विटमध्ये RSSची ओळख असलेली हाफचड्डी जळत असल्याचं दाखवण्यात आलं आहे, यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
भाजपनं काँग्रेसवर केली टीका
काँग्रेसच्या या ट्विटला भाजपनं देखील उत्तर दिलं आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी म्हटलं, काँग्रेसची ही 'भारत जोडो यात्रा' नसून 'भारत तोडो' आणि 'आग लगाओ यात्रा' आहे. काँग्रेस पक्षानं असं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राहुल गांधींना मला विचारायचं आहे की, तुम्हाला या देशात हिंसाचार पसरवायचा आहे का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.