politics sakal
देश

राजीव यांनी आधुनिक भारताचा पाया रचला

पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांकडून श्रद्धांजली

सकाळ न्यूज नेटवर्क / पीटीआय

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त काँग्रेससह पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीरभूमीवरील राजीव गांधी यांच्या समाधिस्थळी आपल्या वडिलांना आदरांजली अर्पण केली. राजीव गांधी प्रचंड दूरदृष्टीचे नेतृत्व होते. त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे आधुनिक भारताचा पाया रचला गेला. ते दयाळू व प्रेमळ होते. ते सदैव माझ्या हृदयात राहतील, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी फेसबुकवर टाकली. (Politics News)

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसद भवनात राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. प्रियांका गांधी यांनी राजीव गांधी यांच्यासोबतचे आपले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. ते अन्याय सहन करत नसत. ते काय योग्य व अयोग्य याबद्दल बोलत असत. खंबीरपणे उभा राहत त्यांनी कपटाने काळवंडलेल्या आकाशात सत्याचा प्रकाश पसरविला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

माहिती-तंत्रज्ञानातील योगदानाची दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली, असे ट्विट त्यांनी केले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही राजीव गांधी यांच्या माहिती-तंत्रज्ञान, शिक्षणातील योगदानाला उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT