Union Minister Rajnath Singh addresses Rajya Sabha, stating India’s readiness to assist Pakistan in controlling terrorism—a significant geopolitical statement.  esakal
देश

Rajnath Singh Rajya Sabha Speech: '..तर आम्ही पाकिस्तानला मदत करण्यास तयार आहोत', राजनाथ यांचं राज्यसभेत मोठं विधान!

Rajnath Singh on Pakistan : ''ऑपरेशन सिंदूर सध्यासाठी थांबवण्यात आले आहे, परंतु जर...'' राजनाथ सिंह यांनी असंही बोलून दाखवलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Rajnath Singh’s Bold Statement in Rajya Sabha :  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज(मंगळवार) राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू केली. ज्यासाठी १६ तासांचा वेळ देण्यात आला आहे. राजनाथ सिंह यांनी एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक केले  आणि म्हटले,‘’आमच्या सैनिकांनी पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले, तेही एकही नागरिकांचा जीव न गमावता. हे भारताच्या ताकदीचे आणि धाडसाचे पुरावेत आहे. 

तसेच राजनाथ सिंह यांनी सांगितले की, जर पाकिस्तानला त्यांच्या देशातील दहशतवादावर नियंत्रण ठेवता येत नसेल. तर भारत त्यांना मदत करण्यास तयार आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी यावर भर दिला की, भारताला पाकिस्तानमधून दहशतवाद संपवायचा आहे. कारण तो संपूर्ण जगासाठी धोका आहे. मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेची एक नवीन धोरण स्वीकारले आहे.

याप्रसंगी बोलताना राजनाथ सिंह यांनी केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर चीन आणि इतर शत्रूंनाही टोला लगावला. ते म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर त्याच्या समर्थकांनाही स्पष्ट संदेश दिला आहे." तर राजनाथ सिंह यांनी असंही स्पष्ट केलं की ऑपरेशन सिंदूर सध्यासाठी थांबवण्यात आले आहे, परंतु जर पाकिस्तानने पुन्हा काही चूक केली तर भारत ते पुन्हा सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

याशिवाय राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारत आता शांतपणे सहन करणारा देश नाही. आम्ही दाखवून दिले आहे की आम्ही एक शक्तिशाली राष्ट्र आहोत. त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की, एक दिवस येईल जेव्हा पीओकेमधील लोक भारताच्या शासनव्यवस्थेचा भाग असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: ''बच्चू कडू मॅनेज?'' आरोप करणाऱ्यांवर कडूंचा संताप; म्हणाले, फायदाच झाला...

एका महिन्याला किती कमावतात माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने? आकडा ऐकून भुवया उंचावतील

IND A vs SA A 1st Test: रिषभ पंतला अपयश; आयुष म्हात्रेच्या फिफ्टीने वाचवली टीम इंडियाची लाज, दक्षिण आफ्रिकेकडे मजबूत आघाडी

IND vs AUS 2nd T20I Live: अभिषेक शर्मा एकटा भिडला! सूर्या, गिल, संजू फेल झाले असताना हर्षित राणा फलंदाजीत चमकला

Smart Anganwadi Kit: डिजिटल चालना; १६१ अंगणवाड्यांना स्मार्ट कि, प्रत्येकी १ लाख ६४ हजार ५६० रुपयांचा निधी, सुधारणेतील मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT