Rajnath Singh eSakal
देश

Rajnath Singh : 'आईच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही'.. आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देताना राजनाथसिंह भावुक

राजनाथ यांनी यावेळी चिनी घुसखोरीवर देखील भाष्य केले. आमची इंचभर देखील जमीन कोणी घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज आणीबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली. ‘‘काँग्रेसचे नेते आमच्यावर हुकुमशाहीची टीका करतात पण आणीबाणीच्या काळात (१९७५) मलाच अठरा महिने तुरुंगामध्ये ठेवण्यात आले होते. याच काळामध्ये माझ्या आईचे मेंदूच्या पक्षाघातामुळे निधन झाले होते पण मला अंत्यसंस्काराला देखील जाता आले नाही. मला तेव्हा तत्कालीन सरकारने पॅरोल देखील मिळू दिला नव्हता, आज हीच मंडळी आम्ही हुकूमशहा असल्याची टीका करत आहेत,’’ असे राजनाथसिंह यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

राजनाथसिंह म्हणाले, ‘‘तेव्हा माझ्या आईवर २७ दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते पण अखेरच्या क्षणीही मला तिचे दर्शन घेता आले नाही.’’ राजनाथ यांनी यावेळी चिनी घुसखोरीवर देखील भाष्य केले. आमची इंचभर देखील जमीन कोणी घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

पाकमधून होणाऱ्या दहशतवादी कारवायांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘पाकला जर त्यांच्या भूमीवरील दहशतवादाचा निःपात करता येत नसेल तर आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. दहशतवाद्यांचा आधार घेऊन जर पाकिस्तान भारताला अस्थिर करू पाहात असेल तर आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ. पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवायला हवे. ते आमचे शेजारी आहेत त्यांची नियत साफ असेल तर दहशतवाद थांबायला हवा.’’

‘घुसकर मारेंगे’चे समर्थन

मध्यंतरी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राजनाथ यांनी ‘घुसकर मारेंगे’ असे विधान केले होते. याबाबत विचारले असता त्यांनी त्याला दुजोरा दिला. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया आम्ही खपवून घेणार नाहीत. हे हल्ले रोखण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT