Delhi Rajpath-Kartavyapath
Delhi Rajpath-Kartavyapath esakal
देश

Delhi : राजपथ नव्हे, आता 'कर्तव्यपथ'; नाव बदलण्याच्या प्रस्तावाला NDMC कडून मंजुरी

सकाळ डिजिटल टीम

आज झालेल्या एनडीएमसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.

Delhi Rajpath-Kartavyapath : दिल्लीच्या राजपथचं (Rajpath) नवं नाव आता 'कर्तव्यपथ' (Kartavyapath) असं असणार आहे. आज (बुधवार) झालेल्या एनडीएमसीच्या (NDMC) बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.

एकेकाळी किंग्सवे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजपथाला आता कर्तव्यपथ म्हटलं जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकारनं राजपथचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधलेल्या विभागाचं उद्घाटन करणार आहेत. राजपथचं नाव बदलण्यासाठी, नवी दिल्ली नगर परिषदेनं (NDMC) आज 7 सप्टेंबरला राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नामांतर सोहळ्याच्या लक्ष्यस्थानी आता राजपथ आला आहे. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत जाणाऱ्या या ऐतिहासिक मार्गाचं नाव आता ‘कर्तव्यपथ’ अर्थात कर्तव्याचा मार्ग असं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि त्याला आज एनडीएमसीच्या बैठकीत मंजुरीही मिळालीय.

काय आहे इतिहास

ब्रिटिश (British) राजवटीमध्ये किंग्जवे या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजपथ किंवा सरकारी मार्ग असं नाव देण्यात आलं. या रस्त्याला मधोमध छेद देणाऱ्या रस्त्याला ब्रिटिशांच्या राजवटीत क्वीन्सवे म्हटलं जात होतं. या रस्त्याला स्वातंत्र्यानंतर जनपथ अर्थात जनतेचा मार्ग असं नाव देण्यात आलं. राजपथ व त्याला छेद देणारा जनपथ या दोन कार्टोग्राफिक संज्ञांच्या माध्यमातून, नवीन प्रजासत्ताकाच्या सामाजिक करारानुसार सार्वभौमत्व जनतेकडं आहे, असा संदेश देण्यात आला होता.

याच सार्वभौम नागरिकांनी, मध्यवर्ती अक्षाद्वारे तयार झालेल्या सेंट्रल व्हिस्टावर पुन्हा दावा सांगितला. या विस्तृत हिरवळीवर नागरिक त्यांच्या इच्छेने सहलीला येऊ शकत होते, चालू शकत होते, आईस्क्रीम खाऊ शकत होते. हे करण्यात त्यांना कोणत्याही अधिकृत नियमाचा किंवा मर्यादेचा अडथळा नव्हता, तो असलाच तर कधीतरी हवामानाच्या लहरींचा किंवा वाहतुकीच्या उपलब्धतेचाच असेल. हे सगळे आता संपणार आहे. कर्तव्यपथावर मुक्त नागरिकांसाठी अत्यंत अल्प जागा आहे.

कोणत्या रस्त्याचं नामकरण करण्यात आलं?

हा रस्ता नवी दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील इंडिया गेटमार्गे राष्ट्रपती भवनापासून नॅशनल स्टेडियमपर्यंत जातो. संसद भवन ते नॉर्थ आणि साउथ ब्लॉक या रस्त्यावर आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात येणारी परेडही याच रस्त्यावर होते. दिल्लीचा राजपथ अनेक अर्थाने खास आहे. आता मोदी सरकारनं या रस्त्याचं नाव बदलून 'कर्तव्यपथ' केलं आहे. यानंतर इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता आणि परिसर कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT