harivansh with mp 
देश

उपसभापती हरिवंश यांची निलंबित खासदारांसोबत 'चाय पे चर्चा'; स्वत: घेऊन गेले चहा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कृषी विधेयकावरून राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईच्या निषेधार्थ आणि उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करत 8 खासदारांनी संसदेच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केलं. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या खासदारांची बेट घेतली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याशी गैरव्यवहार आणि सदनात गोंधळ घातल्याबद्दल व्यंकय्या नायडू यांनी खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई केली. 

कारवाई केल्यानंतर धरणे आंदोलनाला सुरुवात केलेल्या खासदारांनी संसदेच्या आवारातच ठिय्या मांडला. दरम्यान, मंगळवारी सकाळी खुद्द उपसभापती हरिवंश यांनीच सर्व खासदारांना चहा दिला आणि चर्चा केली. 

सभापती व्यंकय्या नायडू यांनी कारवाई केलेल्या खासदारांमध्ये डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजीव सातव, केके राजेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नाझिर हुसैन, इम्रान करिम यांचा समावेश आहे.

ठिय्या मांडलेल्या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांनी आणलेला चहा पिण्यास नकार दिली. निंलबित खासदारांपैकी एक संजय सिंह यांनी सांगितलं की, जेव्हा देशाचे हजारो शेतकरी रिकाम्या पोटी रस्त्यावर या काळ्या कायद्याविरोधात लढत असताना आम्ही इथं वैयक्तिक संबंध कसे जोपासू? आमच्या घरी आले तर आम्ही ते नक्की करू. पण सध्या आम्ही शेतकऱ्यांसाठी इथं बसलो आहे. काळा कायदा मागे घेतला जावा हीच आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. 

राज्यसभेत कृषी विधेयकाला विरोध करताना या खासदारांकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. यावेळी खासदारांकडून नियमावली पुस्तिका फाडण्यात आलं तसंच उपसभापतींचा माईकसुद्धा तोडण्यात आला होता. 

हरिवंश यांच्याविरुद्ध ‘अविश्‍वास’ नाही
दरम्यान, राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह ऊर्फ हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली केल्या. मात्र हा अविश्वास ठराव सभापतींनी फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT