rajyavardhan singh rathore Rajyavardhan Singh Rathore
देश

राठोड यांचा काँग्रेसवर हल्ला; महिलांच्या सन्मानासाठी ओळखले जाणारे राज्य...

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानला तालिबान बनवण्यात आले आहे. शौर्य आणि महिलांच्या सन्मानासाठी ओळखले जाणारे राज्य आता महिलांच्या छळात पहिल्या क्रमांकावर आहे. मंदिर पाडण्यात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. जसे की एका विशिष्ट समुदायासाठी सरकार चालवली जात आहे, असे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड (Rajyavardhan Singh Rathore) म्हणाले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी राज्याला तालिबानी बनवल्याचा आरोप केला.

अलवर जिल्ह्यातील राजगढ शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान दोन मंदिरे पाडण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये (congress) मतभेद आहेत. राजगड ही काँग्रेसशासित राज्यातील भाजपशासित नगरपालिका आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला केलेल्या कारवाईत एका मंदिराच्या पुतळ्याची हानी झाल्याचा आरोप अलवरचे भाजप खासदार बालकनाथ यांनी केला. राजस्थानच्या मंत्री शांती धारीवाल यांनी भाजपवर आरोप करीत राज्य सरकार या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

राजगडमध्ये दोन मंदिरे आणि काही दुकाने फोडण्यात आली. शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या कारवाईला अधिकाऱ्यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम असल्याचे म्हटले आहे. या कारवाईला भाजपशासित राजगढ म्युनिसिपल बोर्डाने मान्यता दिली आहे. कारवाईत कोणत्याही पुतळ्याला किंवा गर्भगृहाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारली आहे.

मंदिर ३०० वर्षे जुने

भाजपचे (BJP) राज्यसभा सदस्य किरोरी माल मीना यांनी शुक्रवारी राजगड गाठले आणि मंदिर पाडण्याच्या विरोधात पोलिस ठाण्यासमोर धरणे दिले. हे मंदिर ३०० वर्षे जुने असल्याचा भाजपचा दावा आहे. त्याचे परिणाम काँग्रेसला (congress) भोगावे लागतील, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या राजस्थान युनिटचे प्रमुख सतीश पुनिया यांनी या कारवाईमागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला. या सर्व कारवाया राज्य सरकारच्या इशाऱ्यावर होत आहेत. हे जनतेला माहीत आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT