देश

CBI चे माजी संचालक राकेश अस्थाना दिल्ली पोलिस आयुक्तपदी

सूरज यादव

सीबीआयमध्ये राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ वादग्रस्त असा राहिला होता. अस्थाना हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे मानले जातात.

नवी दिल्ली - सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयमध्ये राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ वादग्रस्त असा राहिला होता. अस्थाना हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे मानले जातात. 2018 मध्ये अस्थाना यांना सीबीआयमधून हटवण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे बीएसएफ प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती.

1984 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले राकेश अस्थाना सध्या बीएसएफसह एनसीबी प्रमुख आहेत. सीबीआयमध्ये असताना त्यांचा तत्कालीन सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांच्यासोबतचा वाद चर्चेत होता. 2017 मध्ये अलोक वर्मा यांनी अस्थाना यांच्या विशेष संचालक पदी नियुक्तीवर आक्षेप घेत विरोध केला होता.

दिल्ली पोलिसात आता बाहेरच्या कॅडरमधील आयपीएस अधिकाऱ्याला पोलिस आयुक्त केल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. एसएस जोग आणि अजयराज शर्मा यांच्यानंतर अस्थाना तिसरे पोलिस आयुक्त आहेत जे कॅडरच्या बाहेरचे आहेत. बालाजी श्रीवास्तव यांच्याकडे आय़ुक्तपदाचा अतिरिक्त भार देऊन एक महिना होण्याच्या आतच ही नियुक्ती झाली आहे.

राकेश अस्थाना यांनी सूरतचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी आसाराम बापूच्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला होता. तसंच सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाची चौकशीसुद्दा राकेश अस्थाना यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT