Rakesh Jhunjhunwala dead 
देश

Rakesh Jhunjhunwala : 5 हजार ते 5 लाख, 'या' शेअरने झुनझुनवाल यांना बनवले 'बिग बुल'

'बिग बुल' म्हणून प्रसिद्ध असलेले झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्म घेतला.

सकाळ डिजिटल टीम

'बिग बुल' म्हणून प्रसिद्ध असलेले झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्म घेतला.

भारताचे वॉरेन बफे अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झालं आहे. स्टॉक मार्केटमध्ये 'बिग बुल' म्हणून ते ओळखले जात होते. बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती आणि त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असं म्हटलं जातं. गेल्याच महिन्यात 5 जुलै रोजी त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा झाला होता. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

'बिग बुल' म्हणून प्रसिद्ध असलेला झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्म घेतला. फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणुक करुन ते शेअर बाजारात उतरले होते. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे म्हणूनही ओळखले जाते. कॉलेजच्या काळापासून त्यांनी हा व्यापार सुरू केला होता. कॉलेजमध्ये असताना 1985 पासूनच त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली.

या गुंतवणुकीदरम्यान, बीएसई सेन्सेक्स दीडशे अंकांच्या आसपास होता. आणि झुनझुनवाला त्यांनी केवळ पाच हजार रुपयांच्या गुंतवणूकीपासून सुरुवात केली होती. राकेश झुनझुनवाला यांची 3 जुलै 2021 पर्यंत एकूण संपत्ती $4.6 अब्ज (रु. 34,387 कोटी) होती, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. टाटा टीच्या शेअर्समधून त्यांनी पहिला मोठा नफा मिळवला होता. झुनझुनवाला यांनी त्यावेळी टाटा टीचे 5, 000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते.

1986 मध्ये त्यांना या स्टॉकमधून 5 लाख रुपयांचा नफा झाला. अवघ्या तीन महिन्यांतच हा शेअर 143 रुपयांपर्यंत वाढला होता. झुनझुनवाला यांनी अंधेरीच्या रेखा झुनझुनवालासोबत 1987 मध्ये विवाह केला. रेखा झुनझुनवालाही शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. यानंतर त्यांनी 2003 मध्ये स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म रेयर एंटरप्राइजेजची स्थापना केली. पत्नी रेखा यांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांवर त्यांनी या कंपनीचे नाव ठेवले असल्याचे बोलले जाते.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सध्या कंपनीचे 37 शेअर्स आहेत. यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नजर टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्ससह ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीच्या शेवटी ३७ समभाग आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT