rakesh taikait pm modi main.jpg 
देश

PM मोदींच्या भाषणानंतर राकेश टिकैत म्हणे, आम्ही कुठं म्हटलं MSP होणार बंद

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना सोमवारी शेतकरी आंदोलनाबाबत भाष्य करत आंदोलन संपवण्याचे आवाहनही केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) उल्लेख केला. एमएसपी होती, एमएसपी आहे आणि एमएसपी यापुढेही कायम राहील, असे मोदींनी म्हटले होते. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर आता भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांचे वक्तव्य समोर आले आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही केव्हा म्हणालो होतो की एमएसपी बंद होत आहे. आम्ही म्हणालो की, एक कायदा व्हायला हवा. जर असा कायदा झाला तर देशातील सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सध्या एमएसपीवर कोणताय कायदा नाही आणि शेतकरी व्यापाऱ्यांच्या हातून लुटला जातोय. 

पंतप्रधान मोदींनी सभागृहातील आपल्या भाषणात म्हटले की, आम्ही सर्वांशी एकत्रित येऊन चर्चा करण्यास तयार आहोत. मी आज सभागृहात सर्वांना निमंत्रण देतो, असे म्हणताना त्यांनी म्हटले की, सभागृहाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आश्वस्त करतो की, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुरुच राहील. ते म्हणाले, एमएसपी होती, एमएसपी आहे आणि एमएसपी राहील. चुकीची माहिती पसरवली जाऊ नये. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, तुम्ही लोकांनी एफडीआयबाबत ऐकले असेल. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. एक नवीन एफडीआय सध्या आपल्या समोर आला आहे. त्याचा अर्थ आहे, फॉरेन डिस्ट्रिक्टिव्ह आयडॉलॉजी. देशाने या एफडीआयपासून जरुर दूर राहिले पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या या नव्या एफडीआयचा उल्लेख हा, शेतकरी आंदोलनादरम्यान विदेशी सेलिब्रेटिजकडून आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत होता. पॉप सिंगर रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ महादेव कोळी समाजाचा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT