देश

...म्हणून आम्ही संसदेत हसलो; खा. रक्षा खडसेंनी दिले हसण्याचे स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क

जळगांव : काल (ता.19) संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' त्याचे भांडवल करीत आहेत. खासदार भारतीताई पवार बोलल्या म्हणून आम्ही हसलो असे मुळीच नाही, उलट त्यांना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. असे मत खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

लोकसभेत चर्चेच्या वेळी खासदार डॉ. भारती पवार मराठीतून भाषण करीत असतांना खासदार प्रितम मुंडे व खासदार रक्षा खडसे हसत असल्याचा व्हीडीयो मोबाईलवर व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या कि, संसदेत महाराष्ट्राचे खासदार बोलत असल्यास त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थाबंतो, त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. खासदार भारती पवार भाषण करीत असल्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यांचे भाषण सुरू असतांना अगदी शेवटच्या क्षणी आम्ही सहजच हसलो, आणि संसदेत थोडेफार हसणे सुरूच असते.

Video : खा. पवारांनी संसदेत फडणवीसांचं नाव घेतलं; अन् खा. मुंडे, खा. खडसे जोरजोरात हसू लागल्या

आमच्या हसण्याची विषयाची चर्चा करण्यात आली. आमची मिडीयाला विंनती आहे, कि चांगल्या कामाची प्रसिध्दी करावी,त्या मुंडेच्या कन्या आहेत, आणि मी खडसेंची सून आहे म्हणून त्यांनी हास्य केले असे म्हणणे म्हणण योग्य नाही. डॉ.भारती पवार या खासदार आहेत. त्याही नवीन खासदार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT