Ayodhya Ram Mandir 
देश

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या निर्मितीचं काम आता चालणार २४ तास; 'इतक्या' कामगारांची संख्या वाढवली

राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत कामगारांची दोन शिफ्टमध्ये आठ-आठ तासांची ड्यूटी लावली जात होती. मात्र आता तिन्ही शिफ्टमध्ये म्हणजेच २४ तास हे काम केलं जाणार आहे.

रोहित कणसे

राममंदिराचं बांधकाम मागील बऱ्याच काळापासून सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्र्स्टने १५ जानेवारीपूर्वी मंदिराचे जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे पाहता या कामासाठी ५०० मजूरांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ३५०० कामगार काम करत होते. आता या कामगारांची संख्या चार हजार झाली आहे.

राम मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत कामगारांची दोन शिफ्टमध्ये आठ-आठ तासांची ड्यूटी लावली जात होती. मात्र आता तिन्ही शिफ्टमध्ये म्हणजेच २४ तास हे काम केलं जाणार आहे.

राम मंदिराचा तळमजला बांधून तयार झाला आहे. त्याचे फिनिशिंगचे काम जोरात सुरू आहे. तळमजल्यावर फ्लोअरिंगचे काम पूर्ण झाले आहे. तळमजल्यावरील खांबांमध्ये शिल्प कोरण्याचे कामही १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मंदिराच्या गाभार्‍यात बांधलेल्या तीन फूट उंच आणि आठ फूट लांबीच्या सिंहासनाला सोन्याची जडण घालण्याचे कामही सुरू झाले आहे. सिंहासनावर तांब्याच्या पत्रा बसवला जात आहे. या तांब्यावर सोन्याचा थर चढवला जाईल.

मंदिराचा मुख्य दरवाजा आणि गर्भगृहाचे सिंहासन सोन्याने सुशोभित केले जाणार आहे. दिल्लीतील एक ज्वेलर्स कंपनी हे काम करत आहे. १५ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. १५ जानेवारीपर्यंत मंदिराचे जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT