Ram Mandir Ayodhya 
देश

Ram Mandir Ayodhya: "नियतीने ठरवलं होतं की..."; राम मंदिर अभिषेक अन् PM मोदींवर काय म्हणाले लालकृष्ण अडवाणी?

आरएसएस नेते कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार बुधवारी अडवाणी यांच्या घरी गेले होते. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

Sandip Kapde

Ram Mandir Ayodhya: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी याला दुजोरा दिला होता. लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारीला अयोध्येत असतील आणि कार्यक्रमात सहभागी होतील.

आरएसएसचे नेते कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार बुधवारी अडवाणी यांच्या घरी गेले होते. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित केले. अयोध्येतील समारंभात लालकृष्ण अडवाणींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

लालकृष्ण अडवाणी म्हणाले, "नियतीने ठरवले होते की अयोध्येत श्री रामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल." हा क्षण आणल्याबद्दल आणि रामलल्लाचे भव्य मंदिर उभारून त्याचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल अडवाणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले आहे."

आपल्या रथयात्रेतील अविस्मरणीय क्षणांचे स्मरण करून अडवाणी म्हणाले की, "रथयात्रेला जवळपास 33 वर्षे झाली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रेला सुरुवात करताना आपल्याला माहित नव्हते की आपण ज्या प्रभू रामावरील श्रद्धा ठेवून ही यात्रा सुरू करत आहोत ती देशात चळवळीचे रूप घेईल." (Ram Mandir Ayodhya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC आरक्षणात मोठा बदल! दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; नव्या कायद्याला हिरवा कंदील, कुणी घेतला निर्णय?

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Pune News: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फार्मसी प्रवेश प्रक्रिया वेळेत, महाविद्यालयांना ७ दिवसांत मान्यता, पुण्यात PCI अध्यक्षांची घोषणा

Latest Marathi News Live Update: न्यायाधीशांच्या न्यायालयात ७३७ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

SCROLL FOR NEXT