Ram Mandir 
देश

Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्याला पाहुण्यांसह PM मोदींना दिलं जाणार 'हे' खास गिफ्ट

अयोध्येतील भव्य राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेकजण हजेरी लावणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेकजण हजेरी लावणार आहेत. यासाठी प्रत्येक निमंत्रिताला एक खास गिफ्ट दिलं जाणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील खास गिफ्ट मिळणार आहे. (Ram Mandir consecration ceremony guests and PM Modi will be given a special gift as Sacred Soil)

नेमकं काय मिळणार गिफ्ट?

राम मंदिरासाठीच्या खोदकामावेळी जी माती काढली गेली. ही माती डब्ब्यात पॅक करुन ती २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानेच्या सोहळ्याला हजेरी लावतील त्यांना भेट देण्यात येणार आहे. मंदिर ट्रस्टनं शुक्रवारी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितलं की, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला ११,००० हून अधिक पाहुणे आणि निमंत्रित लोक असणार आहेत. या सर्वांना अविस्मरणीय अशी भेट दिली जाणार आहे. पाहुण्यांना राम जन्मभूमीच्या मातीशिवाय प्रसाद म्हणून देशी तुपापासून बनवलेले प्रत्येकी १०० ग्रॅम मोतीचूरचे लाडू देखील दिले जाणार आहेत.

PM मोदींना मिळणार हे खास गिफ्ट

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यूटच्या पाकिटात पॅक केलेली राम मंदिराची १५ मीटरचा फोटो भेट देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या राम भक्तांना देवरहा बाबांच्यावतीनं मोतीचूरचे लाडू प्रसादात देण्यात येणार आहेत. हा लाडूचा प्रसाद सध्या खोक्यांमध्ये पॅक केला जात आहे. देवरहा बाबाच्या शिष्यानं सांगितलं की, हा शुद्ध देशी तुपात बनवलेला लाडू असून यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापरण्यात आलेला नाही. हा लाडू ६ महिन्यांपर्यंत खराब होणार नाही. (Marathi Tajya Batmya)

४४ क्विंटल लाडूचा असणार भोग प्रसाद

रामलल्लासाठी चांदीच्या थाळीत नैवद्य ठेवला जाणार आहे. यामध्ये ४४ कुंतल लाडूंचा नैवद्य ठेवला जाणार आहे. नैवद्य ठेवल्यानंतर जे व्हीआयपी येतील त्यांना प्रसाद दिला जाईल. तसेच जे रामभक्त दर्शनासाठी येतील त्यांना देखील हाच प्रसाद वितरित केला जाणार आहे.

५ लाखांहून अधिक लाडू पाठवणार

अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी उज्जैनवरुन ५ लाख लाडू पाठवण्यात येणार आहेत. इथल्या महाकालेश्वर मंदिर प्रशासनानं मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर २५० क्विंटल लाडू बनवण्याचं काम सुरु केलं आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, लाडवांचा पुरवठा करण्यासाठी पाच दिवस लागतील. तसेच प्रसाद अयोध्येपर्यंत पोहोचवण्यासाठी सुमारे तीन ते पाच ट्रक्सची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT