Ram Mandir Invitation Card 
देश

Ram Mandir Invitation Card: अयोध्येतील उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेची पहिली झलक, कशी आहे राम मंदिराची निमंत्रण पत्रिका? पहा व्हिडिओ

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केलेल्या ६ हजार अतिशय सुंदर आणि आकर्षक निमंत्रण पत्रिका देशभरातील निमंत्रितांना पाठवल्या आहेत.

Sandip Kapde

Ram Mandir Invitation Card

अयोध्येतील भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला. संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. २२ जानेवारीला देशात दिवाळी साजरी करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.  राम मंदिराचा उद्घाटन सोहळ्याचे देशभरातील दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात येत आहेत. या पत्रिकेची पहिली झलक समोर आली आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केलेल्या ६ हजार अतिशय सुंदर आणि आकर्षक निमंत्रण पत्रिका देशभरातील निमंत्रितांना पाठवल्या आहेत.

डीडी न्यूजने आपल्या अधिकाऱ्यामार्फत निमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ दाखवला. अनेक पाने असलेल्या पत्रिकेत येणारे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचा प्रकार, वेळ आणि मंदिराचा इतिहास याबद्दल माहिती दिली आहे. या पत्रिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

या दिमाखदार सोहळ्यासाठी अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात ज्येष्ठ राजकीय नेते, क्रिकेटपटू, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. भाजप नेते अर्जुन मूर्ती यांनी सुपरस्टार रजनीकांत यांनाही आमंत्रित केले आहे.

राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. पाहुण्यांच्या यादीत अनेक बड्या नेत्यांची नावे नाहीत, ज्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.

सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे, ज्यात उत्तर प्रदेशातील मंदिरे आणि मठांमध्ये राम चरितमानस आणि हनुमान चालिसाचे पठण यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश पर्यटन आणि संस्कृती परिषदेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांचे हे कार्यक्रम ११ जानेवारीपासून अभिषेक सोहळ्यापर्यंत सुरू राहतील, ज्यामुळे राज्यात उत्सवासारखे वातावरण होईल, यावर पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वेला उशीर, AC किंवा कोचमध्ये बिघाड असल्यास चिंता करू नका! तिकीटाचा एक-एक पैसा मिळणार परत, IRCTC कडून रिफंड घेण्यासाठी करा हे एकच काम

March Astrology 2026: 30 वर्षांनी मोठा ग्रहयोग! मार्चमध्ये शनि–सूर्य एकत्र, ‘या’ 3 राशींना होणार जबरदस्त आर्थिक फायदा

Solapur News: ‘शक्तिपीठ’चे आमदारांकडून कौतुक; नव्या आराखड्यात माढा तालुक्याचा समावेश, बागायती जमिनीच्या नुकसानीची भीती!

Manali Traffic Jam : मोठ्या विकेंडला पर्यटकांचे हाल ! 'या' प्रसिद्ध ठिकाणी वाहनांच्या प्रचंड रांगा, ३०० मीटर अंतर पार करायला लागले ५ तास

Jalna News : जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार; पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे अजब वक्तव्य

SCROLL FOR NEXT