ram mandir 3d 
देश

राम मंदिराच्या डिझाइनमध्ये केला बदल, 3D फोटोज व्हायरल

सूरज यादव

नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहुर्त ठरल्यानंतर आता मंदिराचं नवं डिझाइन समोर आलं आहे. थ्रीडी डिझाइनमध्ये राम मंदिर आणखी भव्य दिसत आहे. यात मंदिराचे शिखर उंच असल्याचंही दिसतं. मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट निखिल सोमपुरा यांनी मंदिराचे डिझाइन केलं आहे. 

राम मंदिराचे पहिले डिझाइन 1985-86 मध्ये तयार करण्यात आलं होतं. त्यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन डिझाइन तयार केलं होतं. मात्र आता संभाव्य गर्दीचा विचार करता डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. यात मंदिराच्या आकारात बदल करण्यात आला. मंदिराची लांबी, उंची वाढवण्यात आली आहे. 

याआधी तयार केलेल्या डिझाइनमध्ये राम मंदिर दोन मजली होतं. नव्या डिझाइनमध्ये ते तीन मजली करण्यात आलं आहे. याची उंची 161 फूट, लांबी 360 फूट तर तर रुंदी 235 फूट असणार आहे. मंदिराचा मूळ आराखडा तसाच असणार आहे. आणखी तीन शिखरे वाढवण्यात आली आहेत. बाजुला दोन आणि पुढे एक अशी शिखरे असणार आहेत. यामुळे मंदिराच्या शिखरांची एकूण संख्या पाच इतकी होईल. 

राम मंदिराची आधीची उंची 128 फूट होती. आता ती 161 फूट असणार आहे. तीन मजली मंदिरात 318 खांब असतील. प्रत्येक मजल्यावर 106 खांब असणार आहेत. राम ललाचे मंदिर जमीनीपासून 17 फूट उंचीवर असेल. दुसऱ्या मजल्यावर राम दरबार असणार आहे. जवळपास 69 एकर जमिनीवर पाच शिखरांचे मंदिर असेल. 

राम मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. तेव्हा त्यांना अडचण होऊ नये यासाठी मंदिराच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला. राम मंदिराच्या नव्या डिझाइनमध्ये एक मंडप उभारण्याचाही प्रस्ताव आहे. ज्यामध्ये एकाचवेळी पन्नास हजार लोक बसू शकतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

Video : स्वानंदी समरच्या प्रेमकथेला सुरुवात ! समरला मिळालं रोमँटिक सरप्राईज; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT