Ayodhya Ram Mandir esakal
देश

अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

राम मंदिरावर दहशतवादी हल्ला होणारा असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्यानं पोलिस यंत्रणा सतर्क झालीय.

राम मंदिरावर (Ram Temple) दहशतवादी (Terrorist) हल्ला होणारा असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्यानं पोलिस यंत्रणा सतर्क झालीय. एका कथित आयपीएसनं राम मंदिरावर आत्मघातकी हल्ला होण्याचा संदेश पाठवला असून हा मेसेज उत्तर प्रदेशच्या डायल 112 वर पाठवण्यात आलाय. याशिवाय, देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलीय. गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) आपल्या कागदपत्रांचा अहवाला देत ही माहिती दिलीय.

एजन्सीनं सांगितलं की, देशातील अंतर्गत घटक देखील त्यांच्या स्वामींच्या सूचनेनुसार, अशांतता पसरवू शकतात. त्यामुळं सरकार सध्या सतर्क झालंय. पंजाबमध्ये (Punjab) सध्याच्या घडामोडी पाहता, समाजकंटक सक्रिय होऊ शकतात, असं सांगण्यात आलंय. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानं सरकारनं सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क केलीय. यापूर्वी 2 डिसेंबरलाही उत्तर प्रदेशच्या डायल 112 वर अशाच हल्ल्याचा संदेश आला होता. अयोध्येत (Ayodhya) बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. ज्या क्रमांकावरून हा मेसेज आला होता, तो गुजरातचा असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं. पोलिसांनी याचाही तपास केला होता.

राम मंदिराची रेकी करणाऱ्या दहशतवाद्यांना अटक

विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) मोठं यश मिळाले होते. वास्तविक, जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी राम मंदिर आणि पानिपत रिफायनरीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. जम्मूमधून अटक करण्यात आलेले जैशचे चार दहशतवादी पाकिस्तानातील (Pakistan) जैश कमांडरच्या संपर्कात होते. त्यातील एकाचं नाव इजहार खान असं असून तो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामली येथील रहिवासी आहे. त्याचं काम रामजन्मभूमी आणि पानिपत रिफायनरीची रेकी करण्याचं होते. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्ला करण्यापूर्वीच त्याला अटक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT