Ramadan 2023 esakal
देश

Ramadan 2023 : ... पण हजरत पैगंबर आपल्या तत्वांपासून तसूभरही ढळले नाहीत..

हजरत पैगंबर नेहमी आपल्या तत्वांवर कायम असायचे

सकाळ डिजिटल टीम

Ramadan 2023 : कुरेशांनी (मक्कावासी) ह. पैगंबरांना इस्लाम धर्माची चळवळ बंद करण्याकरिता परोपरीने विनंती केली, परंतु ह. पैगंबरांनी आपले कार्य चालू ठेवले. कुरेशांचे सर्व बेत फसल्यानंतर शेवटी त्यांनी हजरत पैगंबरांच्या चुलत्यास सांगितले.

अबू तालिब यांनी ह. पैगंबरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्या तत्त्वापासून हलतील असे चिन्ह दिसेना. (Ramadan 2023 Hazrat Muhammad Paigambar life story )

हजरत पैगंबरांचे चुलते अबू तालिब यांनीही या धर्माची दीक्षा घेतली. पुढे मक्का शहरातील नामांकित योद्धे, इस्लाम धर्माचे अनुयायी झाले.

ज्या इस्लाम धर्मात कोणतीही जात उपजात, उच्च व कनिष्ठ, गरीब किंवा श्रीमंत असे न मानता केवळ समता व समानतेवर आधारलेला, सामान्य माणसांच्या सहज पचनी पडणारा, कोणतेही कर्मकांड अथवा अंधश्रद्धा न पाळणारा, कुणीही मध्यस्थ नसलेला व कोणत्याही ठिकाणी आकाशाखाली स्वच्छ जागी ईश्वराची करुणा मागता येईल, अशी व्यवस्था असणारा हा जो इस्लाम धर्म आज त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचला, त्यासाठी धर्माचे संस्थापक ह. महंमद पैगंबर यांनी किती खस्ता खाल्ल्या, त्यांचा किती अनन्वित छळ झाला.

त्यांच्या अनुयायांना कसे प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागले हे पाहिले की कुणाचेही डोळे पाणावतात. परंतु ह. पैगंबर मात्र आपल्या तत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत.

आता रमजान महिना संपण्याच्या मार्गावर आहे. रमजान महिन्यातील शेवटच्या काही दिवसाचे इस्लाममध्ये फार मोठे स्थान आहे. मुस्लिम बांधव रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत म्हणजे २१, २३, २५, २७ किंवा २९ या विशेष तारखेला मशिदीत अथवा घरी प्रार्थना करून जास्तीत जास्त पुण्य (नेकी) मिळविण्याचा प्रयत्न करतात व याच रात्रीला ‘शबे-कद्र’ असे म्हटले जाते.

भारतामध्येही ‘शबे-कद्र’ची रात्री २६ व २७ वा तारखेमध्ये पाहिली जाते. ‘शबे-कद्र’ २६ वा उपवास सोडल्यानंतर सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT