Akshay Kumar and Ramdev Baba Sakal
देश

रामदेव बाबांनी घेतला अक्षयकुमारचा आधार

योगगुरु रामदेव बाबा आणि ‘आयएएम’ यांच्यात वाद सुरु असतानाच रामदेव बाबा यांनी अभिनेता अक्षयकुमार याचे आयुर्वेदाला पाठिंबा देणारे जुने व्हिडिओ प्रसिद्ध केले.

पीटीआय

नवी दिल्ली - योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) आणि ‘आयएएम’ (IAM) यांच्यात वाद (Dispute) सुरु असतानाच रामदेव बाबा यांनी अभिनेता अक्षयकुमार (Akshaykumar) याचे आयुर्वेदाला (Ayurved) पाठिंबा (Support) देणारे जुने व्हिडिओ (Video) प्रसिद्ध केले. शरीराचा असा कोणताच आजार नाही की त्याचा उपचार या पारंपरिक पद्धतीत नाही, असे अक्षयकुमारने या व्हिडिओंमधून सांगितले आहे. (Ramdev Baba Took the Support of Akshay Kumar)

बाबा रामदेव आणि ॲलोपथी डॉक्टर यांच्यात सध्या वाद सुरू आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या समर्थनासाठी त्यांनी पूर्वी अभिनेता आमीर खान याच्याही जुन्या व्हिडिओंचा आधार घेतला होता. आता त्यांनी काही वर्षांपूर्वी अक्षयकुमारने ट्विटरवर शेअर केलेल्या दोन व्हिडिओंचा वापर केला. या व्हिडिओंमध्ये अक्षयने आयुर्वेदाला खुला पाठिंबा दिला आहे.

‘आपण आपल्या देहयष्टीचे स्वत:च ब्रँड अम्बेसिडर व्हा. साधे आणि आरोग्यदायी जीवन जगा. शरीराचा असा कोणताही आजार नाही की त्याच्यावर आयुर्वेदातून उपचार होत नाहीत. या आपल्या उपचाराच्या पद्धतीला केवळ नैसर्गिकच नाही तर त्याला शास्त्रीय आधार देखील आहे. प्रत्येक उपचाराच्या मागे निश्‍चित लॉजिक आहे. माझा ॲलोपथी आणि औषधाला आक्षेप नाही. ते आपल्याजागी सर्वोत्तम आहे. परंतु आपण उपचारासाठी पारंपरिक पद्धती का विसरत आहोत,’ असे अक्षयने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Bail Order : आरोपीला चुकून जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाने तरीही बदलला नाही आदेश, नेमकं कारण काय ?

Karad News:‘यशवंत’च्या संशयितांना वाचविण्याचे प्रयत्न: ॲड. नीलेश जाधव; भाजपच्या बड्या नेत्यासह एका आमदारावर आरोप!

मनपा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला; भाजप आमदारांच्या समर्थकांचा थेट माजी महापौरांच्या घरावर हल्ला

Mumbai–Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट! ‘मिसिंग लिंक’ एक मेपासून सेवेत; सर्वांत रुंद बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात..

Satara politics: भाजप सातारा जिल्ह्यात महायुतीला डावलून स्‍वबळावर?; जिल्‍हा परिषदेसाठी पालकमंत्र्यांनी बोलावलेल्‍या बैठकीकडे पाठ!

SCROLL FOR NEXT