Rameshwaram Cafe Blast Esakal
देश

Rameshwaram Cafe Blast चे पाकिस्तान कनेक्शन, एनआयएला लागला ऑनलाइन हँडलरच्या ठिकाणाचा शोध

Bengaluru Blast: 2019-20 मध्ये IS अल हिंद मॉड्यूलशी संबंध आल्यानंतर हा 'कर्नल' अब्दुल मतीन ताहा आणि शाजिब यांच्या संपर्कात होता.

आशुतोष मसगौंडे

बेंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये १ मार्च २०२४ रोजी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने या हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल मतीन ताहा आणि IED बॉम्ब प्लांटर मुसावीर हुसेन शाजिब यांना पश्चिम बंगालमधून अटक केली.

दोघांच्या अटकेच्या वेळी एका 'कर्नल'चा उल्लेख आला होता, त्याच्याविषयी काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. तथापि, एनआयएने बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाच्या तपासात एक भक्कम पुरावा शोधला आहे. जो या स्फोटामागील पाकिस्तान कनेक्शन दाखवत आहे.

मतीन आणि शाजिबचा हँडलर कर्नल असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. हे त्याचे खरे नाव नसून सांकेतिक नाव आहे. 2019-20 मध्ये IS अल हिंद मॉड्यूलशी संबंध आल्यानंतर हा 'कर्नल' अब्दुल मतीन ताहा आणि शाजिब यांच्या संपर्कात होता. (Rameshwaram Cafe Blast)

आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, कर्नल दक्षिण भारतातील अनेक तरुणांना क्रिप्टो-वॉलेटद्वारे निधी पुरवतो. तो तरुणांना धार्मिक स्थळे, हिंदू धर्मगुरू आणि प्रमुख स्थळांवर हल्ले करण्यासाठी प्रेरित करतो.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नोव्हेंबर २०२२ मध्ये मंगळुरू ऑटोरिक्षा स्फोटानंतर कर्नल नावाच्या हँडलरबद्दल आम्ही ऐकले होते. तो मध्यपूर्वेत गुप्तपणे काम करतो. बहुधा कर्नल अबुधाबीत आहे.

असेही मानले जाते की, कर्नल आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI इस्लामिक स्टेट (IS) गटाचे छोटे मॉड्यूल तयार करून दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयएसआयने याआधीही आयएस सदस्यांच्या रूपात भारतात दहशतवादी मॉड्यूल प्रायोजित केले आहेत. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत आयएसआय प्रायोजित तीन आयएस मॉड्यूल सदस्यांच्या अटकेतून हे उघड झाले आहे.

रामेश्वरम कॅफे स्फोटातील कथित सहभागाबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने 12 एप्रिल रोजी कोलकाता येथील लपून बसलेल्या ताहा आणि शाजिबला अटक केली.

एनआयएच्या आरोपपत्रानुसार, ताहा आणि शाजिब हे पूर्वी 20 सदस्यीय अल-हिंद मॉड्यूलचा भाग होते. अल हिंदने दक्षिण भारतातील जंगलात आयएसचे राज्य स्थापन करण्याची योजना आखली होती.

मेहबूब पाशा आणि कुड्डालोर-आधारित ख्वाजा मोईदीन यांच्या नेतृत्वाखालील अल-हिंद मॉड्यूल, बंगळुरूच्या गुरुप्पनपल्यातील पाशाच्या अल-हिंद ट्रस्ट कार्यालयातून कार्यरत होते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळच्या घनदाट जंगलात कसे जगायचे यावरील प्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पनची पुस्तकेही त्यांनी विकत घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT