Ramgarh Assembly By-Election esakal
देश

Ramgarh Election : मतदानापूर्वीच काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या, नेत्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

रामगड विधानसभा पोटनिवडणुकीला (Ramgarh Assembly By-Election) अवघे काही तास राहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राजकिशोर यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या.

रामगड : जिल्ह्यातील भुरकुंडा भागात दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या केलीये. या घटनेची माहिती मिळताच भुरकुंडा पोलीस, बरकागावचे काँग्रेस आमदार अंबा प्रसाद (Congress MLA Amba Prasad) व माजी आमदार योगेंद्र साओ घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पोलीस आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला.

रामगड विधानसभा पोटनिवडणुकीला (Ramgarh Assembly By-Election) अवघे काही तास राहिले असून, 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तयारी सुरू आहे. मात्र, पोटनिवडणुकीच्या अवघ्या काही तास आधीच काँग्रेस नेत्याची हत्या करण्यात आलीये. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राजकिशोर उर्फ ​​बिटका बौरी यांच्यावर हल्लेखोरांनी तब्बल 10 गोळ्या झाडल्या. गोळीबारात आमदार अंबा प्रसाद यांच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडालीये.

राजकिशोर उर्फ ​​बिटका हे शनिवारी रात्री घराजवळील जुन्या पेट्रोल पंपाजवळ उभे होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी प्रथम नेत्याच्या पायावर गोळी झाडली, त्यामुळं ते खाली कोसळले. त्यानंतर गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

राजकिशोर यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागल्यानंतर काँग्रेस नेत्याला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मिळताच भुरकुंडा पोलीस दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT