RamNath Kovind visit Esakal
देश

राष्ट्रपतींनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात; म्हणाले,नररत्नांची खाण...

रत्नागिरी जिल्हा नररत्नांची खाण ; राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद

सकाळ डिजिटल टीम

मंडणगड: आपणा सर्वांना माझा नमस्कार... राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आज मी संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फुर्तीभूमी आंबडवेचे (Ambadawe)दर्शन घेतले, मी अत्यंत भावूक झालो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या समोर मी नतमस्तक झालो. माता रमाई व बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना फुले वाहिली.

रत्नागिरी हापूस आंब्याची चव व गोडवा केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही टिकून आहे

आपल्या भाषणात राष्ट्रपती डॉ. कोविंद म्हणाले कि, रत्नागिरी जिल्हा हा नररत्नांची खाण असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने देशाला अनेक रत्ने दिली आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे रत्न म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे, मंडणगड (Mandangad)तालुक्याचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.

रत्नागिरी हापूस आंब्याची चव व गोडवा केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही टिकून आहे व प्रसिद्ध आहे. हाच हापूसच गोडवा संपूर्ण देशातील लोकांच्या जिभेवर आहे व त्याचप्रमाणे येथील माणसं देखील तितकीच गोड व आदर्शवत आहेत. त्यांच्यातील हा गोडवा संपूर्ण देशभरात निर्माण व्हावा अशी अपेक्षा राष्ट्रपती यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त करताना रत्नागिरीकरांची प्रशंसा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT