Wreckage of a Delhi-bound air ambulance seen in a dense forest area near Ranchi after the tragic crash incident.

 

esakal

देश

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Ranchi Air Ambulance Crash : विमानात एकूण सात जण होते; युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू

Mayur Ratnaparkhe

air ambulance from Ranchi to Delhi crashed in a dense forest area :देशात विमान दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. आता आणखी एका भीषण विमान दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. रांची विमानतळ संचालकांनी पुष्टी केली आहे की, चतरा जिल्ह्यातील सिमरिया पोलिस स्टेशन परिसरातील करमाटांड गावाजवळील घनदाट जंगलात एअर अ‍ॅम्ब्यूलन्स कोसळली आहे.

विमानाने रांची विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केले परंतु मार्गातच त्याचा रडारशी संपर्क तुटला. एअर अ‍ॅम्ब्यूलन्सचे विमान दुपारी दीड वाजता निघाले होते आणि दिल्लीत दुपारी साडेचार वाजता पोहचणार होते. मात्र वाटेतच या विमानावर काळाने घाला घातला आणि ते जंगलात कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान एका गंभीर रुग्णाला दिल्लीला घेऊन जात होते. विमानात एकूण सात जण होते. यामध्ये ०१ रुग्ण, ०१ डॉक्टर आणि ०१ पॅरामेडिक, ०२ रुग्णाचे नातेवाईक, ०१ मुख्य पायलट आणि ०१ सह-पायलट यांचा समावेश होता.

तर चतरा पोलीस अधीक्षक सुमित अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. त्यांनी असेही सांगितले की, घटनास्थळी पोहोचल्यानंतरच परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येईल. ही दुर्घटना घनदाट जंगलात घडली असल्याने तेथे पोहोचणे कठीण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Tyre Air Filling Tips : गाडीच्या टायरसाठी नायट्रोजन की रेग्युलर हवा? काय आहे बेस्ट, हवा भरण्याआधी जाणून घ्या कुठे वाचतात जास्त पैसे

Vidarbha: कारची दुचाकीला धडक; उपसरपंच आगाशे यांचा मृत्यू; रामटेक-गोंदिया महामार्गावरील घटना; तणावाचे वातावरण

Latest Marathi Update Live: पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणात पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये २२ जणांचा मृत्यू

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

SCROLL FOR NEXT