देश

'गोगोईंच्या बदनामीची मलाही ऑफर', सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचा गौप्यस्फोट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत एका महिलेने 22 न्यायाधीशांना पत्र लिहिले होते. त्यानंतर, गोगोई यांनी या आरोपाचे खंडन करताना माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचले जात असून देशातील न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचं म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी सरन्यायाधीशांना लैंगिक शोषण प्रकरणात बदनाम करण्याची मलाही ऑफर देण्यात आली होती, असे एक फेसबुक पोस्ट लिहत म्हटले आहे.

पुढील आठवड्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबुजून असे आरोप लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोगोई यांनी सांगितलं. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी सरन्यायाधीशांची बदनामी करण्याची ऑफर मला देण्यात आली होती. त्यासाठी, मला संबंधितांनी मोठी लाचही देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रंजन गोगई यांना सरन्यायाधीशपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशा प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा डाव होता. सदर बाब सांगण्यासाठी मी सरन्यायाधीशांच्या घरी गेलो होतो. मात्र, ते घरी नसल्यामुळे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही, असेही बैंस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी गोगोईंनी प्रश्न उपस्थित केला की, मुख्य न्यायाधीश म्हणून 20 वर्ष मी केलेल्या सेवेचं हे बक्षिस आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6 लाख 80 हजार रुपये आहेत. एवढचं काय तर माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही म्हणून या प्रकारचा आरोप लावला जात आहे, असेही गोगोई म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT