Gujarat Crime News  esakal
देश

Crime News : भयंकर घटना! दीड वर्षांच्या चिमुरडीचा पुरलेला मृतदेह उकरून काढून केला बलात्कार

एका दीड वर्षांच्या मुलीच्या (Girl) मृतदेहावर बलात्कार झाल्याची भयंकर घटना गुजरातमध्ये घडलीये.

सकाळ डिजिटल टीम

पीडितेचे वडील दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला दफन केलेल्या जागी गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Gujarat Crime News : एका दीड वर्षांच्या मुलीच्या (Girl) मृतदेहावर बलात्कार झाल्याची भयंकर घटना गुजरातमध्ये घडलीये. येथील थानगढ परिसरात ही घटना घडली असून विकृताचा शोध सुरू आहे.

या मुलीचा मृत्यू 25 फेब्रुवारीला झाला होता. गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेचा तपास सुरू केलाय.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेच्या हृदयात जन्मजात छिद्र असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. 25 तारखेला तिचा मृत्यू झाला. त्याच दिवशी तिचं दफन करण्यात आलं.

पीडितेचे वडील दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला दफन केलेल्या जागी गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेचा मृतदेह तिच्या मातीच्या थडग्यावर होता. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. जेव्हा तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला तेव्हा डॉक्टरांनीही प्रथमदर्शनी तो पाहून बलात्काराची शंका व्यक्त केली. अद्याप तिचा शवविच्छेदन अहवाल येणं बाकी आहे. दरम्यान, पोलिसांनी या विकृताचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Passport V2.0: पासपोर्ट सेवेत मोठा बदल! भारत सरकारची मोठी घोषणा, जुन्या पासपोर्टचे काय होणार?

IND vs SA 1st Test: शुभमन गिलला नेमकं काय झालं, एका चौकारानंतर अचानक सोडलेलं मैदान! BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Whatsapp Chat Leak Reason: व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायवेट चॅट 'या' कारणाने होतायत लिक! तुम्हीही करताय का ही चूक?

Kolhapur News: ऊस वाहतूक वाहनांचा डेंजर झोन: खड्डे, अंधार आणि अस्ताव्यस्त पार्किंगने वाढला अपघातांचा धोका!

Thane News: ४५ मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! ठाणे ते भिवंडी मार्गाची कोंडी सुटणार; MMRDAची नवी योजना

SCROLL FOR NEXT