MP Rashid Engineer voices concern in Parliament, questioning how to manage ₹1.5 lakh daily expenses—sparking debate on the financial realities of elected representatives.  esakal
देश

Rashid Engineer Parliament Speech: ‘’कदाचित मी आजनंतर संसदेत येऊ शकणार नाही, दररोज दीड लाख कुठून आणू?’’

Rashid Engineer News : जाणून घ्या, खासदार राशिद इंजिनियर यांनी लोकसभेत असं विधान का केलं?

Mayur Ratnaparkhe

Rashid Engineer highlights financial struggle in Parliament: जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघाचे अपक्ष लोकसभा खासदार इंजिनियर राशिद यांनी लोकसभेत बोलताना एक मोठं विधान केलं, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. इंजिनियर राशिद यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे त्यांनी संसदेत येण्यातील अडचणींचा केलेला उल्लेख.

राशिद इंजिनियर यांनी आपले दु:ख व्यक्त करत सांगितले की, "कदाचित आजनंतर मी संसदेत येऊ शकणार नाही. मी दररोज कुठून दीड लाख रुपये आणू , मला आज बोलू द्या." तसेच, खासदार राशिद इंजिनियर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ''माझ्या पैगंबारांचे फरमान आहे की, ज्यांनी एकाही निष्पाप नागरिकाची हत्या केली, त्याने संपूर्ण मानवतेची हत्या केली. पहलगाम मध्ये जे काही घडलं, ती पूर्णपणे माणुसकीची हत्या होती.''

तसेच राशिद यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, ''पहलगाममध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांचं दु:ख आम्हा काश्मिरींपेक्षा जास्त कोणाला समजणार. आम्ही १९८९ ते आजपर्यंत अशी हजारो लोक बघितली आहेत.  तो विध्वंस बघितला आहे, आम्ही क्रबस्तान बघितले आहेत, आम्ही मृतदेह उचलून उचलून आम्ही थकलो आहोत.''

याशिवाय राशिद म्हणाले की,  मी अशा जागेवरून येतो, जिथून सीमा खूप उंच दिसते.  तुम्हाला काश्मिरींचे मन जिंकावं लागेल. मी पाहतोय की तुमच्यापैकी कुणी एकानेही काश्मिरींसाठी शब्द काढला नाही. आज सत्ताधारी आणि विरोधकांना हे ठरवावे लागेल.

तसेच त्यांनी म्हटले की, देश तुम्हाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाला. जिन्ना, नेहरू, गांधी, सरदार पटले, लियाकत अली खान असतील... तुम्ही भारताला एकसंध ठेवू शकला नाहीत. तुम्ही भारताचे तीन भाग केले. काश्मिरींना का मारताय...मी विचारतोय आमचा दोष काय आहे? मी विचारू इच्छितो की आमच्या रक्ताचा हिशोब कोण देईल.

खासदार इंजिनियर राशिद हे टेरर फंडिग प्रकरणी तुरुंगात आहे. त्यांना २०१९ मध्ये बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) अटक करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी  दिल्ली उच्च न्यायालयाने संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी त्यांना कस्टडी पॅरोल मंजूर केला. तथापि, न्यायालयाने त्यांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी तुरुंगातून संसदेपर्यंत वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी दररोज १.४५ लाख रुपये खर्च करण्यास सांगितले आहे. संसदेत येण्यासाठी होणाऱ्या खर्चातून दिलासा मिळावा यासाठी इंजिनियर राशिद न्यायालयातही फेऱ्या मारत आहेत, परंतु त्यांच्या प्रयत्नाना अद्याप यश आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT