Mohan Bhagwat News  esakal
देश

खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरंही करतात : मोहन भागवत

'तुमचा धर्म वेगळा असेल तर वाद होणार. तुमचा देश वेगळा असेल तरही वाद होणार.'

सकाळ डिजिटल टीम

'तुमचा धर्म वेगळा असेल तर वाद होणार. तुमचा देश वेगळा असेल तरही वाद होणार.'

Mohan Bhagwat News : संघ प्रमुख मोहन भागवत यांनी श्री सत्य साई यूनिव्हर्सिटी फॉर ह्युमन एक्सिलेन्सच्या (Sri Satya Sai University for Human Excellence) पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात भागवतांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं. धर्मांतराचाही उल्लेख करत त्यांनी लोकसंख्येवरही मोठं विधान केलंय.

खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरंही करतात. जंगलात सर्वाधिक शक्तीशाली झालं पाहिजे. मात्र, इतरांना मदत करणं ही मानवाची ओळख आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलंय. भविष्यातील अभ्यास आणि भुतकाळातील ज्ञानाचा आधार सोबत घेऊन भारताला पुढं नेण्याचे संकेत मिळत आहेत. भारत प्रगती करेल असं दहा बारा वर्षापूर्वी कुणी म्हटलं असतं तर त्याला आम्ही गंभीरपणे घेतलं नसतं. 1857 पासून ही प्रक्रिया सुरू झाली. स्वामी विवेकानंदांनी (Swami Vivekanand) ती पुढं नेकली. अध्यात्माद्वारे श्रेष्ठत्व प्राप्त केलं जाऊ शकतं. कारण, विज्ञान अजून सृष्टीतील स्त्रोताला समजून घेऊ शकलेलं नाही, असं भागवत म्हणाले.

'शक्तीशालीही जिवंत राहतो हा जंगलाचा नियम आहे'

केवळ जिवंत राहणं हा आयुष्याचा उद्देश असू नये. मनुष्याची अनेक कर्तव्य असतात. ती वेळोवेळी पार पाडली पाहिजे. केवळ खाणं आणि जन्माला घालणं ही कामं तर जनावरेही करतात. शक्तीशालीही जिवंत राहतो हा जंगलाचा नियम आहे. पण, तोच शक्तिशाली जर दुसऱ्यांचे रक्षण करत असेल तर तो मनुष्य असल्याचा पुरावा आहे. जर तुमची भाषा वेगळी असेल तर वाद होणार. तुमचा धर्म वेगळा असेल तर वाद होणार. तुमचा देश वेगळा असेल तरही वाद होणार. पर्यावरण आणि विकासात नेहमीच वाद झाला आहे. गेल्या हजार वर्षात अशा पद्धतीनं जगाचा विकास झाला आहे, असंही ते म्हणाले.

भारतानं गेल्या काही वर्षात चांगला विकास केला

यूएनच्या रिपोर्टनुसार, भारत लवकरच लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचं हे विधान आलं असून त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमात त्यांनी विकासावरही चर्चा केली. देशानं गेल्या काही वर्षात मोठा विकास केला आहे. आपण बराच विकास पाहिला आहे. इतिहासाकडून शिकून भविष्याचा विचार करून भारतानं गेल्या काही वर्षात चांगला विकास केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT