Rahul Gandhi  Esakal
देश

Rahul Gandhi Latest News : देशात प्रत्येक संघटनेत RSS चे लोक, मंत्रालयातही हस्तक्षेप; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi : भारतामध्ये नागरिकांना एकमेकांबाबत प्रेम आणि सन्मान आहे

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे आज लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ते आपल्या स्थानिक नेत्यांना भेटणार आहेत. यावेळी ते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. याचबरोबर लडाख येथे विविध ठिकाणी जाऊन युवकांची संवाद साधणार आहेत.

यावेळी राहुल गांधी बोलताना म्हणाले की, या देशातील प्रत्येक संस्थेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या लोकांना सामील करून घेतले आहे. राहुल गांधी यावेळी असे हि म्हणाले की, केंद्र सरकार मधील कोणत्याही मंत्र्याला आपण विचारले तर ते उत्तर देतील की, आम्ही आमचं मंत्रालय चालवत नसून आर.एस.एसने नियुक्त केलेले ओ.एस.डी आमचे मंत्रालय चालवत आहेत. सध्या प्रत्येक मंत्रालय, प्रत्येक संस्था आर.एस.एस चालवत आहे.

लेहमध्ये राहुल गांधी हे आपले वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पैंगोंग हिल येथे त्यांना श्रद्धांजली देणार आहेत. २० ऑगस्ट १९४४ साली राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. काँग्रेस या दिवसाला 'संवेदना दिवस' म्हणून साजरा करतो.

राहुल गांधी यांनी लद्दाख मध्ये युवा काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संवाद साधला त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. राहुल गांधी यावेळी देशातील राजकारणी देशामध्ये द्वेषाने वातावरण तयार करत असल्याचे म्हणाले. मात्र जर तुम्ही संपूर्ण भारतात चाललात तर तुम्हाला समजेल की भारतामध्ये नागरिकांना एकमेकांबाबत प्रेम आणि सन्मान आहे.

मला लोकांच्या मध्ये जाऊन खूप काही शिकायला मिळालं आहे. मी विविध राज्यांमध्ये गेलो. हजारो लोकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी देशाचे मुख्य मुद्दे बेरोजगारी, महागाई, शिक्षण हे आहेत. मात्र याबाबत जास्त बोललं जात नाही. तर इतर मुद्द्यांवर बोललं जात आहे. देशाच्या प्रमुख मुद्द्यांवर कोणीही बोलत नाही. असेही राहुल गांधी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT