raviraj gaikwad writes blog about coronavirus human nature
raviraj gaikwad writes blog about coronavirus human nature 
देश

बुलाती है मगर जाने का नै, ये दुनिया है, इधर जाने का नै!

रविराज गायकवाड

Coronavirus : न्यूयॉर्क-मॅनहॅटनच्या रस्त्यांवर शुकशुकाट. रस्त्यांवर एखाद्या जंगलात उगवावं तसं गवत उगवलंय. रस्त्यांवर माणसं नाही तर, जनावरं फिरतायत. शहरात एकही माणूस शिल्लक नाही. शहराला लागून उपनगरातल्या एका बंगल्यात फक्त एक माणूस राहतो. त्याचं नाव डॉ. रॉबर्ट. त्याच्या सोबत फक्त त्याचा कुत्रा आहे. जगभरातल्या माणसांना एका व्हायरसची लागण झालीय. मानव जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. माणूस निशाचर बनला आहे. त्याच्या शरिरावर सूर्यप्रकाश पडला की, तो जळून खाक होतो. त्यामुळं त्याला रात्री आपल्या अन्नासाठी भटकावं लागलं. व्हायरसची लागण न झालेला व्यक्तीचं रक्त हे त्याचं अन्न. एखादी काल्पनीक कादंबरी वाटावी, असा हा सिनेमा आहे. Yes I am Legent नावाचा हा सिनेमा 2007मध्ये रिलीज झाला होता. विल स्मिथनं डॉ. रॉबर्टची भूमिका केली होती. डॉ. रॉबर्ट शहरातच राहून संशोधन करतो. व्हायरसची लागण न झालेला तो शहरात एकमेव माणूस आहे. त्यानं आपल्या बंगल्यालाही सुरक्षित केलयं. बंगल्याच्या बेसमेंटमधील लॅबमध्ये तो संशोधन करतो. 

इटलीला मोजावी लागली किंमत
आज कोरोनाच्या माध्यमातून जगावर किंबहुना मानव जातीवर ओढवलेलं हे संकट या हॉलिवडूनपटापेक्षा वेगळं नाही. हॉलिवूडचे अनेक सिनेमा आपल्याला काळाच्या पुढं नेणारे आहेत. कल्पनाही करू शकत नाही, अशी संकटं जगावर ओढवल्याचं हॉलिवूडनं आपल्याला अनेकदा दाखवलंय. पण, सिनेमात असं संकट पाहण आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं यात प्रचंड फरक आहे. कोरोनानं चीनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. चीनमध्ये कोरोनाचे बळी जात होतो. तेव्हा चीन सोडून सगळं जग गाफील होतं. चीनच्या खाद्य संस्कृतीला, नावं ठेवण्यात संपूर्ण जगानं धन्यता मानली. पण, हेच संकट आपल्या दारात आलं तर काय करायचं? असा विचार कोणी केला नाही. या गाफीलपणाची खूप मोठी किंमत इटलीनं मोजलीय अजूनही मोजावी लागत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला चीनी व्हायरस असं नाव देऊन, नव्या वादाला तोंड फोडलंय. आता या सगळ्याला जबाबदार कोण? दोषी कोण? हे ठरवण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून त्या संकटाचा मुकाबला करणं गरजेचं आहे. 

निसर्गानच दाखवून दिलं!
कोरोना व्हायरसच्या निमित्तानं माणसातला माणूस, आपल्यावर संकट ओढवण्याच्या भीतीनं काय करू शकतो हे आपल्याला पहायला मिळत आहे. जपाननं डायमंड क्रूझ जहाज आपल्या बंदरावर थांबू दिलं पण, जहाजावरील प्रवाशांना देशात प्रवेश दिला नाही. प्रवाशांचा रोष थांबवण्यासाठी जवळपास दोन हजार आयफोन जहाजावर पाठवून दिले. पण, आपल्या भूमीवर पाय ठेवू दिला नाही. हे झालं जपानचं. दुसरीकडं महाराष्ट्रात, थायलंडहून आलेल्या एका कुटुंबाला सोसायटीत येऊ न दिल्याची घटन घडली. नफेखोरांना तर ऊत आलाय. मास्क, सॅनिटायझर यांच्या किंमती वाढल्या. काहींनी तर जुने मास्क धुवून पुन्हा विकण्याचा प्रताप केला. जीवावर आलं तरी, पैसा कमावण्याची वृत्ती या संकट काळातही पहायला मिळाली. मुळात माणसानं निसर्गाला अक्षरश: ओरबाडून खाल्लयं. आता निसर्गानच अशी अद्दल घडवलीय की, माणसाला भौतिक गोष्टींना किती महत्त्व द्यायचं याचा विचार करण्याची वेळ आलीय. सदैव ट्रॅपिकच्या आवाज ऐकलेल्या एखाद्या चौकात चिमण्यांचा, पक्षांचा आवाजही ऐकू येतो, हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर निसर्गानच आपल्याला दाखवून दिलंय. कारण, मानव जातीचा हा विषाणू शत्रू तुमच्या आमच्या डोळ्याला दिसतही नाही. पण, त्याचं अस्तित्व धडकी भरवणारं आहे. ही सुद्ध निसर्गाचीच किमया म्हणायची.

बुलाती है मगर जाने का नै!
मध्यंतरी कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड परिसराला पुरानं तडाखा दिला होता. त्यावेळी या शहर आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या मूळ गरजा काय आहेत? याचा विचार करायची वेळ आली होती. आज संपूर्ण देशाला, जगाला याचा विचार करण्याची वेळ आलीय. कारण, कधीही न बंद पडणारा उद्योग म्हणून, पर्यटन उद्योगाचा उल्लेख केला जात होता. आज, हा पर्यटन उद्योग कधी सावरणार हे सांगणं कठीण होऊन बसलंय. कोरोनाचं हे संकट दूर होईलच, त्यात शंका वाटत नाही. पण, त्यानंतर संपूर्ण जागाचं चित्र बदलेलं असेल, असं वाटतंय. जगण्याच्या पद्धती बदलतील. व्यवसाय, उद्योग, नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल. शहरांकडचा ओढा कमी होईल आणि माणसं आपल्या छोट्या गावात परतू लागतील. अशा अनेक शक्यता आहेत. माणसाच्या चुका, माणसाची प्रवृत्ती, माणसाचा लोभ, असं सगळं या कोरोनाच्या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर आलंय. मुळात Man is a social animal, असं अर्थशास्त्रात म्हटलंय. आता या सोशल प्राण्याला स्वतःला वाचवायचं असले तर, त्याला सोशल होऊन चालणार नाही. तुम्हाला कितीही बाहेर पडावसं वाटलं तरी बाहेर पडायचं नाही. त्यामुळं डॉ. राहत इंदौरी यांच्या ओळी इथं लिहाव्याशा वाटतात. 'बुलाती है मगर जाने का नै, ये दुनिया है, इधर जाने का नै!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT