RBI  Sakal
देश

RBI: दहा वर्षातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा २०१९ मध्ये ! आरबीआयच्या आकडेवारीतून धक्कादायक वास्तव उघड

ल्या दहा वर्षात देशातील एकूण बँकांमध्ये सर्वात मोठा १ लाख ७१ हजार ७७४ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा २०१९ मध्ये झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Reserve Bank of India : गेल्या दहा वर्षात देशातील एकूण बँकांमध्ये सर्वात मोठा १ लाख ७१ हजार ७७४ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा २०१९ मध्ये झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घोटाळ्यातील केवळ ९ टक्के रक्कम बॅंकांमध्ये परत आली. विशेष म्हणजे याच वर्षात देशात लोकसभा निवडणूक झाली. त्यामुळे या घोटाळ्यातील १ लाख ५५ हजार ८१९ कोटी रुपये निवडणुकीत तर वापरले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बँकांमधील घोटाळे, अनियमितता, अफरातफर आता नवीन नाही. परंतु या घोटाळ्याचे आकडे अनेकांच्या भुवया उंचावणारे आहेत. गेल्या दहा वर्षात, अर्थात २०१३-१४ ते २०२२-२३ या काळात देशातील एकूण बॅंकांंमध्ये ५ लाख ३२ हजार १८१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नोंद केली आहे. आरबीआयने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून घोटाळ्यांच्या आकडेवारीने सरकार, बॅंकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घोटाळ्यांतील रकमेच्या आकडेवारीसोबतच घोटाळ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे घोटाळेबाजांवर काहीच कारवाई होत नसल्याने घोटाळ्यांची संख्याही वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विविध बॅंकांमध्ये ६९ हजार ७०७ घोटाळे झाले आहेत. २०१३-१४ या वर्षात ४ हजार २९५ घोटाळे झाले असून घोटाळ्याची रक्कम ९ हजार ९८६ कोटी होती. (Latest Marathi News)

पुढील २०१४-१५ या वर्षात ४ हजार ६३१ घोटाळे झाले असून घोटाळ्यातील रक्कम १९ हजार १३ कोटी रुपये एवढी होती. २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये दुप्पट रकमेचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच वर्षात लोकसभा निवडणूक झाली होती. त्यानंतर सातत्याने घोटाळ्यांची संख्या व रक्कम वाढत गेल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. २०१९-२० या वर्षात ८ हजार ५८८ घोटाळे झाले. यात १ लाख ७१ हजार ७७४ कोटींच्या रकमेचा समावेश आहे.

रकमेचा विचार केल्यास गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा घोटाळा याच वर्षात झाला. याच वर्षात देशात लोकसभा निवडणूकही झाली. या घोटाळ्यातील काही रक्कम बँकांनी वसुलीही केली. परंतु ही टक्केवारी केवळ ९ आहे. बॅंकांनी घोटाळ्याच्या एकूण रकमेपैकी केवळ १५ हजार ९५५ कोटी वसूल केले. अर्थात १ लाख ५५ हजार ८१९ कोटी रुपये बॅंकांना परत मिळाले नाहीत. ही रक्कम निवडणुकीत तर खर्च केले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT