reason of Odisha Train Accident railway minister said responsible for train accident have also identified
reason of Odisha Train Accident railway minister said responsible for train accident have also identified 
देश

Odisha Train Accident : २८८ मृत्यू तर ११०० जखमी; समोर आलं भीषण अपघाताचे कारण, रेल्वेमंत्री म्हणाले...

रोहित कणसे

ओडिसातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा बळी गेला. तर ११०० हून अधिक जण जखमी झालेत. दरम्यान आता या अपघाताचे कारण समोर आले आहे.

आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सलग दुसऱ्या दिवशी बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचे कारणही सांगितले आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. तसेच याला जबाबदार असलेल्या लोकांचीही ओळख पटली असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांनी हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला.

पंतप्रधान मोजींनी दिलेल्या सूचनांनूसार काम वेगाने सुरू आहे. काल रात्री ट्रॅकचे काम जवळजवळ पूर्ण झाले. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व डब्बे काढण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत सामान्य मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रेल्वेमंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही अपघातस्थळी दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपस्थित आहेत.

आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २८८ झाली आहे. ११७५ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३८२ जणांवर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि इतर जखमींना ५०,००० रुपये मदत जाहीर केली आहे.

या अपघाताच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकापूर्वी, ते मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनवर गेले होते, जिथे ते आधीच थांबलेल्या मालगाडीला धडकली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्सप्रेससाठी अप मेनलाइन सिग्नल देण्यात आला होता आणि नंतर तो काढून टाकण्यात आला होता. यामुळे गाडी लूप लाइनमध्ये घुसली.

मालगाडीला धडकल्यानंतर त्याचे काही डबे रुळावरून घसरले. दरम्यान, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून गेली आणि रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडकल्याने तिचे दोन डबे उलटले.

ट्रेन 128 किमी वेगाने धावत होती

128 किमी प्रतितास वेगाने धावणारी कोरोमंडल एक्सप्रेसबंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस ११६ किमी प्रतितास वेगाने धावत होती.

२,५०० हून अधिक प्रवासी

या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये २,५०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर, अडकलेल्या १,५०० प्रवाशांना विशेष गाड्यांद्वारे त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यात येत आहे. शनिवारी १,००० प्रवाशांना हावडा येथे नेण्यात आले. २०० प्रवाशांना बालासोरहून हावडा येथे दुसऱ्या ट्रेनने आणले जात आहे. भद्रकहून चेन्नईला जाणाऱ्या स्पेशल ट्रेनमधून २५० प्रवासी पाठवण्यात आले. यातील १३३ प्रवासी चेन्नईत, ४१ विशाखापट्टणममध्ये आणि उर्वरित इतर शहरांमध्ये उतरतील.

२०० रुग्णवाहिका, दोन हवाई दल हेलिकॉप्टर तैनात

अपघातस्थळी ५० बस आणि ४५ मोबाईल हेल्थ युनिट कार्यरत होते. गंभीर जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी IAF ने डॉक्टरांच्या टीमसोबत दोन Mi-I हेलिकॉप्टर तैनात केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT