vaccination 
देश

Record Vaccination: देशात लसीकरणाचा विक्रम; एका दिवसात सर्वाधिक लोकांना लस

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीची सुरुवात होऊन एक वर्ष झाला आहे. तरीही विषाणूने हाहाकार सुरुच ठेवला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाची स्थिती अधिक भयानक बनताना दिसत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं म्हटलं आहे. त्यातच देशात कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. विषाणूवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. देशात शुक्रवारी 20.53 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याने लसीकरणाचा हा एका दिवसातील विक्रम आहे. सर्वाधिक 3.3 लाख लशीचे डोस उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आले आहेत. आतापर्यंत 74 टक्के डोस उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, केरळ आणि कर्नाटक या राज्यांना देण्यात आले आहेत. 

शनिवारपर्यंत देशातील 2.91 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. यात 78.6 लाखपेक्षा अधिक लोक 60 वर्षे वयावरील आणि 13.8 लाख लोक 45 ते 59 वर्षे वयावरील आहेत. देशात लसीकरण 16 जानेवारीला सुरु करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली होती. 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला. सध्या देशात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जात आहे. देशात आणखी सहा लशी उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. 

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कोरोना लसीकरणासाठी खासगी हॉस्पिटल्सनाही परवानगी देण्यात आली आहे. तसेच 24 तास लसीकरण सेवा पुरवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. लवकरच तरुणांना कोरोनावरील लस दिली जाण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT