देश

डॉक्टरांवरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करा; केंद्राचे राज्यांना आदेश

विनायक होगाडे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी राज्य सरकारांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा तसेच साथरोग कायदा (सुधारित) 2020 अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संकटाच्या या काळात देशातील वेगवेगळ्या भागात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना तसेच केंद्र शासित प्रदेशांना हे पत्र पाठवलं आहे.

भल्ला यांनी या पत्रात म्हटलंय की, आपण या गोष्टीशी सहमत असाल की, डॉक्टर्स अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी अथवा हल्ल्याची घटना त्यांचं मनोबल कमी करु शकते. तसेच त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करु शकते. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृह सचिवांकडून देण्यात आले आहेत.

त्यांनी पुढे म्हटलंय की, हल्लेखोरांविरोधात FIR दाखल केली गेली पाहिजे तसेच अशा प्रकरणांमध्ये गतीने कारवाई झाली पाहिजे. आपण परिस्थितीनुसार साथरोग (सुधारित) 2020 कायद्यातील तरतुदींचा देखील वापर करु शकता. या कायद्याअंतर्गत डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात सामील असणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कैद आणि दोन लाखांचा दंड देखील होऊ शकतो.

याशिवाय जर एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्यावर झालेल्या हिंसेमुळे गंभीर नुकसान झाल्यास अपराधी व्यक्तीला सात वर्षांपर्यंत कैद आणि पाच लाखांपर्यतचा दंड देखील होऊ शकतो. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा ठरु शकतो. कोरोनाच्या या संकटादरम्यान सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट्सवर देखील लक्ष ठेवलं जावं. कोरोना काळात डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनोबल घटेल, असं वर्तन होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 25th Installment Date 2027 : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसान योजनेचा 25 वा हप्ता कधी मिळणार? 'या' महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता

IND vs NZ 2nd ODI Live : न्यूझीलंडने LIVE मॅचमध्ये टीम बदलली, फलंदाजीला दुसरा खेळाडू अन् आता गोलंदाजीला Matt Fisherला उतरवले, त्याने विकेट घेतली; नेमकी भानगड काय?

बीडीडी रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! मूळ मुंबईकरांना शहरातच घरे, चावीवाटप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update: एकनाथ शिंदे जालन्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

'रामायण' मध्ये रावणाच्या भूमिकेला कुणी दिलाय आवाज? लोकप्रिय मराठी अभिनेत्याने केलीये यशच्या आवाजाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT