Chhattisgarh Dharam Sansad sakal media
देश

छत्तीसगड धर्मसंसदेत धार्मिक नेत्यांकडून नथुराम गोडसेचं कौतुक, FIR दाखल

सकाळ डिजिटल टीम

रायपूर : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दोन दिवसीय 'धर्म संसद' (Chhattisgarh Dharam Sansad) भरविण्यात आली होती. यामध्ये जवळपास २० धार्मिक नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी काहींनी (Hindu) हिंदू राष्ट्रासाठी शस्त्र हातात घेण्यास सांगणारी भडकाऊ भाषणं केली. तसेच एकाने महत्मा गांधींची (Mahatma Gandhi) हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं (Nathuram Godse) कौतुक केलं. त्यानंतर गांधीविरोधी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

धार्मिक संसदेमध्ये देशभरातील जवळपास २० नेत्यांनी सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी सशस्त्र होऊन तयार राहण्याचे आवाहन सनातनी हिंदूंना केले. महाराष्ट्रातील धर्मिक नेता 'संत' कालीचरण यांनी महात्मा गांधींविरुद्ध अपमानास्पद विधाने केली. तसेच अल्पसंख्याक समाज विविध देशांचे राजकारण आणि प्रशासन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानानंतर संसदेचे संयोजक आणि दूधधारी मठाचे प्रमुख महंत राम सुंदर दास यांनी तीव्र निषेध नोंदविला. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा कालीचरण विरुद्ध आयपीसी कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

एनजीओ नीलकंठ सेवा समिती आणि दूधधारी मठ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काँग्रेस नेते प्रमोद दुबे आणि भाजप नेते ब्रिजमोहन अग्रवाल आणि विष्णू देव साई उपस्थित होते. स्वामी प्रभोदानंद गिरी, ज्यांनी यापूर्वी हरिद्वार येथील वादग्रस्त ‘धर्म संसद’ मध्ये वक्तव्य केले होते, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, “मी हरिद्वारमध्ये आणि त्याआधीही जे बोललो ते पुन्हा सांगण्यास मला काहीच हरकत नाही. हे सर्व धर्मनिरपेक्ष लोक हिंदूविरोधी आहेत, कोणी हिंदू धर्माबद्दल बोलले तरी त्यांच्या पोटात दुखते. राज्यातील धर्मगुरू ‘संत’ त्रिवेणी दास हे अशा अनेकांपैकी एक होते ज्यांनी सर्व हिंदूंना ‘हिंदु राष्ट्र’ चे रक्षण करण्यासाठी सशस्त्र होण्यास सांगितले.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT