remains of a 2800-year-old settlement found in PM Narendra Modi village Vadnagar Gujarat watch video  
देश

PM मोदींच्या गावात सापडली अडीच हजार वर्षांपूर्वीची मानवी वसाहत; समोर आला Video

आयआयटी खङ्‌गपूरच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण(एएसआय), भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेजच्या संयुक्त सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : गुजरातेतील वडनगरमध्ये इ.स.पूर्व ८०० वर्षांपूर्वीच्या (सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वींचे) मानवी वसाहतीचे पुरावे आढळले. आयआयटी खङ्‌गपूरच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण(एएसआय), भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेजच्या संयुक्त सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘क्वाटरनरी सायन्स रिव्ह्वुज’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

‘हवामान, मानवी वसाहत आणि पूर्व ऐतिहासिक ते मध्ययुगीन काळात दक्षिण आशियात झालेले स्थलांतर; पश्चिम भारतातील नवीन पुरातत्त्व उत्खननातून’ या दीर्घ शीर्षकाने नियतकालिकात अहवाल प्रकाशित झाला आहे.

वडनगरमधील सखोल पुरातत्त्व उत्खननातून तीन हजार वर्षांच्या प्राचीन काळात विविध राजवटींचा उदय व अस्त, मध्य आशियातील योद्ध्यांकडून दुष्काळ किंवा पावसामुळे वारंवार झालेली आक्रमणे आदींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे, असे आयआयटी खङ्‌गपूरने म्हटले आहे.

आयआयटीचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक अनिद्य सरकार म्हणाले, वडनगरमधील मानवी वसाहत इ.स. पूर्व १४०० वर्षे जुनी असल्याचेही आमच्याकडील अप्रकाशित रेडिओकार्बन तारखांमधून सूचित होते. हा काळ हडप्पा नागरी संस्कृतीनंतरच्या समकालीन असू शकतो. हे जर खरे असेल तर ते भारतातील गेल्या ५,५०० वर्षांतील सांस्कृतिक सातत्य सुचविते आणि तथाकथित अंधारयुग हे मिथक असू शकते, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, वडनगरमध्ये इ.स.पूर्व ८०० वर्षांपूर्वी मानवी वसाहतीस सुरूवात झाली. बौद्ध किंवा जैन या दोन्ही धर्मांच्यापूर्वीच्या लोहयुग किंवा उत्तर वैदिक काळात येथे पहिली मानवी वसाहत स्थापन झाली असावी. याच काळात मौर्य राजवटही होती. या राजवटीचे इ.स.पू. १५० वर्षांपूर्वी पतन झाले. गुप्ता साम्राज्याच्या पतनानंतर मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, जलस्रोत कोरडे पडणे, दुष्काळ आणि लोकसंख्या घटण्यासारख्या घटना घडल्या. ते म्हणाले, भारतीय इतिहासाच्या २,२०० वर्षांच्या अराजकतेच्या काळात मध्य आशियापासून भारतावर (गुजरातसह) सात आक्रमणे झाली. या आक्रमणाचे ठसे वडनगरच्या सलग सांस्कृतिक कालखंडातदेखील आढळतात. उत्खननादरम्यान येथे मातीची भांडी, तांबे, सोने, चांदी आणि लोखंडी वस्तू आणि गुंतागुंतीचे नक्षीकाम असलेल्या बांगड्या सापडल्या. वडनगरमध्ये भारत-ग्रीक राजवटीदरम्यान ग्रीक राजा अपोलोडाट्‌सने बनविलेले नाण्यांचे साचेही सापडले.

वडनगर आतापर्यंत भारतात उत्खनन करण्यात आलेले एकाच तटबंदीचे सर्वांत प्राचीन शहर असल्याचे आमच्या पुराव्यावरून सिद्ध होते. भारतात इतरत्र पूर्वेतिहासिक ते मध्ययुगीन पुरातत्वीय नोंदी अचूक कालानुक्रमानुसार असलेले असे दुसरे शहर सापडलेले नाही. त्यामुळे, वडनगर या दृष्टीने अद्वितीय आहे.

-अभिजित आंबेकर, ‘एएसआय’चे पुरातत्वशास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT