Remdesivir Injection Google file photo
देश

प्लाझ्मानंतर रेमडेसिव्हिरच्या वापरावर बंदी?

कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला होता. बेकायदेशीररित्या हे इंजेक्शन ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात होते.

एएनआय वृत्तसंस्था

कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला होता. बेकायदेशीररित्या हे इंजेक्शन ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात होते.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona second wave) थैमान घातले असून तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनावर कोणतेही खात्रीलायक औषध सापडले नसल्याने या महामारीला रोखायचं कसं हेच आव्हान सर्वांपुढे आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन, लसीकरण हेच उपाय सध्यातरी दिसत आहेत. कोरोनावरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला (Plasma Therapy) काही दिवसांपूर्वी हटविण्यात आले. या पार्श्वभूमीवर आणखी एक बातमी समोर आली आहे. (Remdesivir may be dropped soon as there is no proof of its effectiveness in treating COVID-19 patients says Dr Rana)

कोरोना रुग्णांवरील उपचारामध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. सर गंगाराम हॉस्पिटलचे संचालक डॉ. डी. एस. राणा म्हणाले की, कोरोना उपचारांच्या नियमावलीमधून रेमडेसिव्हिरला काढून टाकले जात आहे. कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये रेमडेसिव्हिर प्रभावी ठरत असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. कोरोना महामारीच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झाला होता. बेकायदेशीररित्या हे इंजेक्शन ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकले जात होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचार नियमावलीतून वगळण्यात आली होती. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीकडून प्रतिपिंडे घेऊन ती कोरोना रुग्णाला देण्यात येत होती. पण प्लाझ्मा दिल्यानंतरही कोरोना रुग्णांमध्ये कोणतेही बदल होत नसल्याचे गेल्या एक वर्षाच्या आकडेवारीतून दिसून आले. दुसरी गोष्ट म्हणजे प्लाझ्मा सहज उपलब्ध होत नाही. वैज्ञानिक आधारावर प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली होती. पण कोरोना उपचार नियमावली भिन्न तथ्यांचा आधारे तयार केली आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आल्याचे डॉ. राणा यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोविडच्या उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या औषधांचा विचार करता रेमडेसिव्हिर प्रभावी ठरत असल्याबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे अशा औषधांचा वापर करणे टाळणे आवश्यक आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT