Muslim Girl esakal
देश

High Court : 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; कोर्टाचा मोठा निर्णय

या प्रकरणी 16 वर्षीय मुलीला पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणी 16 वर्षीय मुलीलाही पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.

High Court News : 15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी (Muslim Girl) तिच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकते आणि तिचा विवाहसुध्दा वैध मानला जाईल, असा महत्वपूर्ण निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं (Punjab and Haryana High Court) एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला.

या प्रकरणी 16 वर्षीय मुलीलाही पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली. न्यायमूर्ती विकास बहल (Justice Vikas Bahl) यांच्या खंडपीठासमोर जावेद नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये त्यानं आपल्या 16 वर्षांच्या पत्नीसोबत राहण्याची परवानगी मागितली होती. मुलीला हरियाणातील पंचकुला (Panchkula Haryana) येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. याचिकाकर्त्यानं दावा केला होता की, 'लग्नाच्या वेळी त्याच्या पत्नीचं वय 16 वर्षांपेक्षा जास्त होतं. लग्न तिच्या स्वेच्छेनं आणि कोणतीही जबरदस्ती न करता झालं.'

जावेदनं आपल्या वकिलामार्फत सांगितलं की, आम्ही दोघंही मुस्लीम आहोत आणि 27 जुलैला मणि माजरा येथील मशिदीत मुस्लिम रितीरिवाजांनुसार आम्ही निकाह केला. युनूस खान विरुद्ध हरियाणा राज्यातील उच्च न्यायालयाच्या समन्वय पीठाच्या निर्णयावर अवलंबून राहून याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, 'मुलीला याचिकाकर्त्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी.'

'15 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलगी लग्न करू शकते'

मात्र, राज्याच्या वकिलांनी या याचिकेला विरोध करत ती अल्पवयीन असल्यामुळं तिला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात येत असल्याचं सांगितलं. राज्याच्या वकिलांनी याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. परंतु, उच्च न्यायालयानं आपल्या निकालात 15 वर्षे पूर्ण केलेल्या मुलीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार आहे, असं नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT