Republic Day 2023 esakal
देश

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण का होत नाही? संविधानात दडलं आहे कारण

प्रजासत्ताकदिनी ध्वज फडकवला जातो तर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल जात. यातला नेमका फरक काय माहित आहे का?

सकाळ डिजिटल टीम

Republic Day 2023 : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या यंदा राजपथावर देशाचा झेंडा फडकवतील. प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याची रौनक, राजपथावरच्या परेड आणि या राष्ट्रीय सणाची शानच काही और असते असे म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होत नाही. याचं उत्तर आपल्या संविधानातच आहे.

२६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी देशभारात ध्वज फडकवला जातो. तर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केलं जातं. यातला नेमका फरक आपल्याला माहित नसतो. ध्वजाच्या पोझीशनवर त्याचे रोहण होणार की, फडकवला जाणार हे समजत असतं.

राष्ट्रीय ध्वजाची पोझिशन?

प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी ) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते.

स्वातंत्र्यदिनाला (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जाते.

हा सोहळा कोणत्या ठिकाणी केला जातो ?

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर होता व राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात.

तर स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.

सोहळा कसा असतो?

तर प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षादलाच्या तीनही दलांची परेड होते. तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांची राजपथावर परेड होते.

स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT