देश

PM मोदींच्या लूकची चर्चा; निवडणूक असलेल्या दोन राज्यांशी संबंध

सकाळ डिजिटल टीम

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) पेहराव चर्चेत असतो.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी (Republic Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावेळी नवा लूक बघायला मिळाला. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) पेहराव हासुद्धा चर्चेत असतो. यावेळी त्यांनी डोक्यावर टोपी आणि गळ्यात घातलेला उपरणा दोन राज्यांची खास अशी ओळख आहे. मोदींनी घातलेली टोपी उत्तराखंडची (Uttarakhand) आणि उपरणा मणिपूरचा (Manipur) आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवरून मोदींनी टोपी घातल्याबद्दल त्यांचं आभार मानलं आहे. तसंच प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडची टोपी घालून राज्याची संस्कृती आणि परंपरेचा गौरव केल्याचंही म्हटलं आहे.

उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुढच्या महिन्यात निवडणुका आहेत. पंतप्रधान मोदींच्या या पेहरावामागे दोन्ही राज्यांसाठी खास संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे.

पंतप्रधान मोदींनी बुधवारी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त १० वाजता इंडिया गेटजवळ असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी शहीदांना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर ते राजपथावरी सोहळ्यासाठी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT