Pashupati Paras esakal
देश

Pashupati Paras : केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

बिहारमधील जागावाटपावरून रुसवेफुगवे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बिहारमध्ये एनडीएमध्ये जागावाटपाला २४ तास होण्यापूर्वीच तेथील रुसवेफुगवे बाहेर आले असून केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे एनडीएतील घटक असलेले उपेंद्र कुशवाहही नाराज असल्याने त्यांची मनधरणी सुरू आहे.

बिहारसाठी ‘एनडीए’ने सोमवारी सायंकाळी जागावाटप जाहीर केले. यात भाजपला १७, जेडीयूला १६, लोक जनशक्ती पक्षाला ५, जीतनराम मांझी व उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री पशुपती पारस यांना मात्र एकही मतदारसंघात स्थान दिले नाही. त्यांनी हाजीपूर मतदारसंघावर दावा केला होता. परंतु या मतदारसंघातून चिराग पासवान यांनी निवडणूक लढविण्याचे घोषित केले आहे. या कारणामुळे केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आता ‘इंडिया’ आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचे ‘इंडिया’ आघाडीत स्वागत असल्याचे तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे.

कुशवाहही नाराज

एनडीए आघाडीतील जुने सदस्य उपेंद्र कुशवाह यांना केवळ एकच जागा मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी दोन जागांची मागणी केली होती. नाराज कुशवाह यांची मनधरणी करण्यासाठी बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी त्यांची भेट घेतली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT